शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या
Brother killed her minor sister : शिर्डीतून एक हदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सख्ख्या भावानेच 17 वर्षीय बहिणीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
ADVERTISEMENT
Brother killed her minor sister : शिर्डी: शिर्डीतून एक हदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सख्ख्या भावानेच 17 वर्षीय बहिणीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भावाने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉक बहिणीच्या (Sister) डोक्यावर व चेहऱ्यावर मारून तिची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी भावाने (brother) पळ काढला होता.मात्र आरोपी भावाला अटक करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे.दरम्यान या प्रकरणात पोलिस आरोपी भावाची चौकशी करतात. तसेच भावाने बहिणीची हत्या का केली? याचे कारण शोधले जात आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण शिर्डी हादरली आहे. (brother killed her minor sister shocking crime story from shirdi)
ADVERTISEMENT
शिर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Police) नंदकुमार दुधाळ यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनूसार, शिर्डी (Shirdi) शहरातली कालिकानगर परिसरातील मयुरेश्वर कॉलनीत कुलथे कुटुंब राहते. या कुटुंबातील 19 वर्षीय भाऊ श्रुत कुलथेने स्वत:च्याच 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीशी (Sister) भांडण झाले होते. या भांडणातून श्रुत कुलथेने आपल्याच सख्या बहिणीच्या डोक्यात व तोंडावर पेव्हर ब्लॉक मारून तिची निघृण हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपी भाऊ (brother) श्रुत कुलथे फरार झाला होता. या घटनेनंतर कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिस आरोपी भावाच्या मागावर होते.
हे ही वाचा : पाचव्या पतीला इन्सुलिनमधून दिलं विष; महिलेच्या क्रूर कृत्याने पोलिसही हादरले
दरम्यान पोलीस तपासाच श्रुत कुलथे फरार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र येवला येथे आरोपी श्रुत कुलथे कपड्यावर रक्ताचे डाग असलेल्या अवस्थेत पोलीस निरीक्षक पाडूरंग पवार यांना सापडला होता. यावेळी पाडूरंग पवार यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, आरोपीने भावाने बहिणीची हत्या केल्याची कबूली दिली होती.
हे वाचलं का?
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तत्काळ संपर्क करून हत्या प्रकरणातील आरोपी येवला येथे ताब्यात घेतल्याची माहिती दिली होती. यानंतर शिर्डी पोलिसांचे पथक येवला येथे दाखल होतं, त्यांनी आरोपी भाऊ श्रुत कुलथेला ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान आता येवला पोलिसांनी श्रुत कुलथेचा कसून तपास करायला सुरुवात केली आहे. आरोपी श्रुत कुलथेने आपल्या सख्या बहिणीची हत्या का केली?याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT