मंदिर परिसरात बलात्कार करून हत्या, चेहऱ्यावरील ‘त्या’ खुनेमुळे आरोपी गजाआड

मुंबई तक

ADVERTISEMENT

buldhana rape and murder in the temple area murderer arrested
buldhana rape and murder in the temple area murderer arrested
social share
google news

बुडढाणा जिल्ह्यातील एका मंदिर परिसरात एका 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. मंदिरासारख्या पवित्र स्थानी ही घटना घड़ल्याने शहरात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात आरोपीला अटक करणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपीला अटक केली. सदानंद भगवान रोडगे (वय 24) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. (buldhana rape and murder in the temple area murderer arrested)

ADVERTISEMENT

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात राहणारी एक सहा वर्षीय मुलगी 12 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रोहडा गावात आली होती. या गावातील तपोवन देवी मंदिरात लग्न होते. या लग्नसमरंभासाठी ती आई-वडिलांसोबत आली होती. ज्या दिवशी ती आली त्याच दिवशी ती बेपत्ता झाली होती. या प्रकरणी आई-वडिलांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबिय मिळून आरोपीचा शोध घेत होते.

हे ही वाचा :  साखरपुड्यानंतर बलात्कार… लग्न दुसऱ्या मुलीशीच, नवरदेवाची पोलिसांनीच काढली वरात!

मंदिरा मागे मिळाला मृतदेह

बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चिमुकलीचा मृतदेह मंदिरामागे सापडला होता. मृतदेहाला प्राथमिक दृष्ट्या पाहिले असता तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र पोलिसांनी ज्यावेळेस मृतदेह पोस्टमार्टमसाठा पाठवाला होता.त्यावेळी जी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आली ती पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण चिमुकलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.

हे वाचलं का?

पूजेचे साहित्य विकणारा निघाला नराधम

दरम्यान चिमुकलीचा बलात्कार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मंदिर परीसरात तपास सुरू केला. अनेकांची चौकशी करायली सुरूवात केली. या दरम्यान एक संशयित तरूण सापडला. या तरूणाच्या चेहऱ्यावर खरचटल्याचे निषाण होते. या निषाणाची चौकशी केली असता दाढी करताना ब्लेडने वार केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने घटनेची कबूली दिली होती. या प्रकरणात पोलीसांनी सदानंद भगवान रोडगे (वय 24) या आऱोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : आधी बोलायचा ताई, नंतर बनली गर्लफ्रेंड; तुकडे-तुकडे केले अन्… अंगावर काटा आणणारी कहाणी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT