आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज सुर्वेवर एका म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून सीईओला काही कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडल्याचा प्रकार आमदार प्रकाश सुर्वे यांच्याच कार्यालयात घडला आहे.
ADVERTISEMENT
Raj Surve News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांच्या मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज सुर्वेवर (Raj Surve) एका म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून सीईओला काही कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडल्याचा प्रकार आमदार प्रकाश सुर्वे यांच्याच कार्यालयात घडला आहे. (case Filled against Raj Surve, son of Prakash Surve in abduction and death threat)
ADVERTISEMENT
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचा मुलगा राज सुर्वेविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करण्याता आल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राज सुर्वेसह 10-15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Congress: तुम्हाला माहितेय राहुल गांधींनी लोकसभेत नेमके कोणते पोस्टर दाखवले?
राज सुर्वेंवर नेमका आरोप काय?
राज प्रकाश सुर्वे याच्याविरुद्ध राजकुमार जगदीश सिंग (वय 38) यांनी तक्रार दिली आहे. ते ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा.लि. या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची कंपनी डिजिटल लॅटरल ठेवून कर्जही देते.
हे वाचलं का?
तक्रारीत म्हटलं आहे की, मनोज मिश्रा यांची आदिशक्ती प्रा.लि. म्युझिक कंपनी आहे. त्यांना राजकुमार सिंग हे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतात. मनोज मिश्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कंपनीचे लायसन्स गहाण ठेवून कर्ज दिले. तसे एका वर्षासाठी करारही झाला होता.
No-Confidence Motion : ‘हुकूमशहा किती घाबरट… राहुल गांधींना फक्त 4 मिनिटे दाखवलं’, काँग्रेसचा आरोप
मनोज मिश्राने 2021 मध्ये ग्लोबल म्युझिक कंपनीकडून 8 कोटींचं कर्ज घेतले. झालेल्या कराराप्रमाणे त्यांच्याकडून 11 कोटी रुपये मिळणार होते. हे करारपत्र 2026 पर्यंत होते. मात्र, मनोज मिश्राने दिलेल्या पैशाचा वापर इतर गोष्टींसाठी केला आणि त्याच्या परिणाम नफ्यावर झाला, असे तक्रारीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सिंग यांनी मिश्रांना कंटेट बनवण्यास सांगितले. त्यावर मिश्रांनी आणखी पैसे मागितले. त्याला पैसे सिंग यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याने करार रद्द करण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. पण, सिंग यांनी त्याला सेटलमेंट करूयात असे सांगितले.
ADVERTISEMENT
राजकुमार सिंग यांचे अपहरण आणि…
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे बुधवारी (9 ऑगस्ट) 3.15 वाजता एका व्यक्तीने सिंग यांना कॉल केला. कॉल केलेल्या व्यक्तीने सिंग यांना भेटायला बोलावले, पण सिंग यांनी शनिवारी येतो असे सांगितले. त्यानंतर सिंग यांच्या कार्यालयात 10-15 जण घुसले.
Crime:बायकोशी वाद झाला, पित्याने पोरालाच संपवलं, धक्कादायक घटनेने शहर हादरलं
10-15 जणांनी राजकुमार सिंग यांना मारहाण केली. त्यानंतर ऑफिसमधून जबरदस्ती घेऊन गेले. त्यानंतर हे लोक सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्वमधील कार्यालयात घेऊन गेले. तिथे राज सुर्वे बसलेला होता. मनोज मिश्राही तिथे होता. तिथेच राज सुर्वे आणि मनोज मिश्राने राजकुमार सिंग यांच्याकडून करार रद्द झाल्याचे लिहून घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 10-12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT