Chandrapur : दारू सोडायला गेले अन् जीव गमावून बसले, तरुणांसोबत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandrapur crime news two died to critical medicine consume to quit alcohol chandrapur news
चंद्रपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
social share
google news

Chandrapur Crime News : चंद्रपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दारू सोडण्यासाठी औषध खाल्ल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय19), प्रतीक घनश्याम दडमल (26, रा. गुळगाव) अशी या मृतांची नावे आहेत.या घटनेने गावात खळबळ माजली आहे. 

भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील चार जण जाम जवळील शेडगाव जिल्हा वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडवण्यासाठी 21 मे रोजी गेले होते. महाराजांनी त्यांना औषध दिली. सायंकाळी गावी परतल्यानंतर या चारही तरूणांनी ही औषध घेतली. यानंतर चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सहयोग सदाशिव जीवतोडे (19), प्रतीक घनश्याम दडमल (26, रा. गुळगाव) या दोघांचा मृत्यू झाला. तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (45) आणि सोमेश्वर उद्धव वाकडे (35) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे ही वाचा : भाजपला 272 जागा मिळाल्या नाही तर.. पवारांचं मोठं विधान

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, रुग्णालयात दाखल झालेल्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, औषध देणारे बाबा हे वर्धा जिल्ह्यातील असल्याने सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती भद्रावती पोलिस ठाण्याचे अधिकारी विपीन इंगळे यांनी दिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : भाजपचा होणार मोठा विजय! अमेरिकेतील विश्लेषकाने सांगितला आकडा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT