कार अपघातात मुलगा गेला, वडिलांनी आनंद महिंद्रांवरच गुन्हा केला दाखल

ADVERTISEMENT

Child dies car accident airbag not deploying case against 13 people including anand mahindra
Child dies car accident airbag not deploying case against 13 people including anand mahindra
social share
google news

UP Accident : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आणि त्यांच्या कंपनीच्या 13 कर्मचाऱ्यांविरोधात एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर कानपूरच्या (Uttar pradesh Kanpur) रायपुरवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Child dies car accident airbag not deploying case against 13 people including anand mahindra)

वाढदिवसात कार दिली भेट

राजेशने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला स्कॉर्पिओ कार भेट दिली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा आपल्या मित्रांसमवेत लखनऊहून कानपूरला गेला होता. 14 जानेवारी 2022 रोजी तो वाहनातून घरी येत असताना धुक्यामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात कार दुभाजकाला धडकून त्यांचा मुलगा अपूर्वाचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा  >>‘तुझं माझं जमेना, तु्झ्याशिवाय…’ 10 पैकी 7 महिला नवऱ्याचा करतात ‘विश्वासघात’

फसवणूक करून कार विकली

अपूर्वीच्या वडिलांनी ही कार तिरुपती ऑटोमोबाईल्समधून खरेदी केली होती. त्यानंतर 29 जानेवारी रोजी त्यांनी शोरूममध्ये जाऊन कारमधील दोषही सांगितला होता. सीट बेल्ट असूनही एअरबॅग लावण्यात आली नव्हती. त्यामुळे आपली फसवणूक करून कार विकल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावेळी अपूर्वाच्या वडिलांनी म्हटले आहे की, वाहनाची नीट तपासणी केली असती तर माझ्या मुलाचा मृत्यू झालाच नसता असंही त्यांनी म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणावर बोलत असताना त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याबरोबर वाद घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता कारमध्ये एअरबॅग लावला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा  >> MLA Disqualification Case : ‘सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्या’, ठाकरे गटाचा युक्तिवाद

महिंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा

कंपनीने सांगितलेल्या दोषांकडे दुर्लक्ष करुन न्यायालयामार्फत आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध रायपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कानपूर पोलिसांनी सांगितले आहे की, कारची तपासणी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT