Crime : बाथरूममध्ये गेला अन् स्कूल ड्रेसच्या टायने…कुटुंब हादरलं!
सुशीलने शाळेच्या ड्रेसमधल्या टायने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आईने जेवणावरून ओरडल्याने व सायकल चालवण्यास रोखल्याने मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) ही घटना घडली आहे. या घटनेने शहर हादरलं आहे.
ADVERTISEMENT
आजकाल क्षुल्लक कारणावरून भांडणाच्या किंवा आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.या घटनेत एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 9 वर्षीय सुशील कुमार असे या मृत मुलाचे नाव आहे. सुशीलने शाळेच्या ड्रेसमधल्या टायने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आईने जेवणावरून ओरडल्याने व सायकल चालवण्यास रोखल्याने मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) ही घटना घडली आहे. या घटनेने शहर हादरलं आहे. (class three student nine year old boy end his life with school tie kanpur crime story)
मिळालेल्या माहितीनूसार, कानपूरच्या नरवल परिसरात सुशील कुमार नावाचा 9 वर्षाचा मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. सुशील हा इयत्ता तिसरीत शिकत होता. त्या दिवशी सुशील कुमार शाळेत गेला होता. शाळेतून परतल्यानंतर आईने त्याला जेवायला वाडले होते. मात्र जेवण न जेवताच सुशीलने सायकल चालवण्यास काढली होती. कारण त्याला सायकल चालवण्याची आवड होती. याचा आईला राग आला आणि सुशील कुमारवर ओरडली होती. तसेच सुशीलला त्याच्या मोठ्या भावाने देखील ओरडले होते. या ओरडण्याचा राग मनात धरून सुशील नाराज झाला आणि आपल्या खोलीत जाऊन बसला होता.
हे ही वाचा : सातारा जिल्हा हादरला! घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह
बाथरूममध्ये घेतला गळफास
आई आणि भावाच्या ओरडण्याला सुशील कुमार अपमान समजला आणि जेवलाच नाही. त्यानंतर रात्री टॉयलेटमध्ये जाऊन त्याने स्कूल ड्रेसच्या टायने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांना या घटनेची कल्पना देखील नव्हती.मात्र बाथरूममध्य़े जाऊन सुशील बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय वाढला. त्यामुळे दरवाजा उघडताच कुटूंबियांना धक्काच बसला. यावेळी कुटुंबियांनी तत्काळ सुशील कुमारला रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या घटनेवर एडीसीपी अशोक कुमार सिंह म्हणाले की, मुलाने शाळेच्या ड्रेसमधल्या टाईन गळफास घेतला आहे. मृत मुलाच्या आईने सायकल चालवण्यावरून त्याला ओरडले होते. यामुळे रागाच्याभरात मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे कारण समोर येणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा : Video :झिंज्या उपटल्या, लाथा-बुक्यांनी मारलं, महिला पायलटला जमावाने मारहाण का केली?
ADVERTISEMENT