वसईतील धर्मांतर प्रकरणात नवीन ट्विस्ट, बापाला मुस्लिम बनवलं, मुलाचा प्रयत्न फसला

मुंबई तक

ADVERTISEMENT

conversion case in vasai father converted to muslims now son attempt failed police arrestesd accused
conversion case in vasai father converted to muslims now son attempt failed police arrestesd accused
social share
google news

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केला जात असल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणात 400 जणांचे धर्मांतर केल्याचा दावा केला जात आहे. या 400 जणांमधील वसईतील (vasai) जानी हे एक कुटुंब असल्याची माहिती आहे. या कुटुंबातील राजेश जानी यांना मुस्लिम बनवण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा 18 वर्षीय मुलगा देवांग याला देखील मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. यासाठी आरोपी सतत देवांगला फोन करून त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपीचा हा प्रयत्न फसला असून देवांगने थेट पोलीस ठाण्यात (Police) तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुंब्रा (Mumbra) येथून मोहसीन याला अटक केली आहे. तसेच त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता १८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (conversion case in vasai father converted to muslims now son attempt failed police arrestesd accused)

ADVERTISEMENT

वसईतील (vasai) राजेश जानी या इसमाला मुस्लिम बनवल्यानंतर त्याच्या 18 वर्षांच्या मुलालाही मुस्लिम बनविण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवांग जानी (18) हा तरूण वसईच्या मिस्त्री नगर येथे राहतो. त्याचे वडील राजेश जानी हे मुस्लिम धर्माच्या प्रभावाखाली येऊन त्यांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले होते. वडिलांचे धर्मपरिवर्तन केल्यानंतर काही दिवसांनी देवांगलाही मुस्लिम बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला. राजेश जानी यांनी इस्लाम कबूल केला आहे. तुम्ही ही कबूल कला असे त्याला फोनवरून सांगण्यात येत होते.

हे ही वाचा : Mira Road : तुकडे कुकरमध्ये शिजवणे, कुत्र्यांना टाकणे; हा राक्षसीपणा येतो कुठून?

मुंब्रा येथील मोहसीन सोनी हा इसम देवांगला सतत फोन करून इस्लाम धर्माबाबात सांगत होता. तुझे वडील आमच्याकडे आहेत. तू सुध्दा ये. तसेच मोहसीन दैवी शक्ती असल्याचाही दावा करत होता. मात्र देवांग त्यांच्या जाळ्यात सापडला नाही. त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी मोहसीन याला मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याविरोधात अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी मोहसीनला मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता 18 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai : दरवाजा उघडला आणि चादरीत सापडला मृतदेह, धारावीत भयंकर हत्याकांड

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT