मैत्रिणच निघाली हैवान! विद्यार्थीनीला दारु पाजली; तिघांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई तक

crime news : आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून, या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मैत्रिणीच निघाली हैवान!

point

विद्यार्थीनीला दारु पाजली; तिघांकडून सामुहिक बलात्कार

Crime News : एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या या निष्पाप मुलीला तिच्याच एका मैत्रिणी असलेल्या सिमरन तमांग हिने गोड बोलून आणि विश्वासात घेऊन घराबाहेर बोलावले होते. सिमरनने तिला एका चारचाकी वाहनात बसवून दारू पाजली आणि ती बेशुद्ध पडताच तिला दुर्गापूरच्या सिटी सेंटर परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या राज मल्लिक आणि शेख अजारुद्दीन या नराधमांनी आणि त्यांच्या साथीदारांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केले.

हेही वाचा : राजेंद्र राऊत म्हणाले, अकलूजच्या चौकात विजयी सभा घेणार, आता मोहिते पाटलांंचं प्रत्युत्तर

पीडित मुलीला बायपासजवळ बेशुद्ध अवस्थेत सोडलं 

हा अमानवीय प्रकार घडवून आणल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला बायपासजवळ बेशुद्ध अवस्थेत बेवारस सोडून पळ काढला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही बाब एका ड्रायव्हरच्या लक्षात आली. त्याने माणुसकी दाखवत तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवले. आपल्या मुलीची दयनीय अवस्था पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर, दुर्गापूर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : जरांगे समर्थक महिला थेट हाकेंना भिडली, रस्त्यावरील राड्याचा व्हिडीओ

हे वाचलं का?