Akola : अख्खं गाव हादरलं! शाळेच्या छतावर सापडली 4 अर्भकं, पोलिसही चक्रावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अकोल्यात जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर चार अर्भकं सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

point

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे बाकीचे मासाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

point

याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

धनंजय साबळे-

ADVERTISEMENT

Akola Crime News : अकोल्यात (Akola Crime) एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेच्या छतावर चार अर्भकं (Infants) सापडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अकोला पोलीस (Akola Police) सध्या घटनास्थळी पोहचून या घटनेचा शोध घेत आहेत. ही अर्भकं या ठिकाणी आली कुठून याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. 

ही घटना अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर घडली आहे. 4 नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे. बाकीचे मासाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही. 

हे वाचलं का?

या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ज्या ठिकाणी अर्भकांचे हे अवशेष सापडले तिथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त 500 किंवा 1000 मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अर्भकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे.

कसा झाला धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश?

जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू छतावर गेला. यावेळी एक तरूण चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता त्याला रक्ताने माखलेली एक प्लास्टिक पिशवी आढळली. त्यानंतर त्याने ती उघडली आणि त्यात अर्भक आढळले. त्याने तातडीने फोन करून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तसंच पुढील तपास सुरू आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT