65 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या; घरगुती नोकरावर संशय, पण त्याचाही बॉडी सापडल्याने खळबळ
Crime News : पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी देवराजू (वय 50) हा मृत महिलेच्या घरी घरगुती नोकर म्हणून काम करत होता. देवराजू हा मूळचा तामिळनाडूतील होसूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी देवराजू याचा मृतदेहही त्याच घरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
65 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या;
घरगुती नोकरावर संशय, पण त्याचाही बॉडी सापडल्याने खळबळ
Crime News : बंगळुरु शहरातील केएएस कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 65 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत महिलेचे नाव सविता शंकर (वय 65) असे असून, ही घटना शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी देवराजू (वय 50) हा मृत महिलेच्या घरी घरगुती नोकर म्हणून काम करत होता. देवराजू हा मूळचा तामिळनाडूतील होसूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी देवराजू याचा मृतदेहही त्याच घरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी. मात्र रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या घटनेचा उलगडा झाला. मृत सविता शंकर यांचे पती हे दुबईत वास्तव्यास असून, ते रविवारी पहाटे घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी डोअरबेल वाजवली. त्या वेळी पहिल्या मजल्यावर झोपलेल्या त्यांच्या 27 वर्षीय मुलीने दरवाजा उघडला आणि पुन्हा आपल्या खोलीत गेली. त्यानंतर पती जेव्हा घराच्या ग्राउंड फ्लोअरवरील बेडरूममध्ये गेले, तेव्हा त्यांना सविता शंकर या मृतावस्थेत आढळून आल्या. त्याच खोलीत आरोपी देवराजू याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी त्या वेळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर असल्याने तिला या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती.
पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच माईको लेआउट पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डिप्टी कमिश्नर ऑफ पोलिस (दक्षिण-पूर्व) मोहम्मद सुजीथा एम.एस. यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले असून, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. माईको लेआउट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, बलात्कार व हत्येचा तसेच संशयित आरोपीच्या मृत्यूचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. ही हत्या नेमकी कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत घडली, याचा सखोल तपास केला जात आहे.
परिसरात भीतीचे वातावरण










