शिक्षिकेचा सहा महिने सुरु होता छळ, पीडितेच्या नवऱ्यालाही काही करता आलं नाही, अखेर कंटाळून टोकाचं पाऊल
Crime News : एका महिला शिक्षिकेवर गेली 6 महिने शाळेतील सहकाऱ्यांकडून गैरवर्तन केलं जात होतं. तसेच तिला अनेकदा त्रासही देण्यात आला होता. यामुळे महिला शिक्षिकेनं गळफास घेत आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिला शिक्षिकेवर 6 महिने सहकाऱ्यांकडून गैरवर्तन

आत्महत्येमागचं खरं कारण समोर आलं
Crime News : एका महिला शिक्षिकेवर गेली 6 महिने शाळेतील सहकाऱ्यांकडून गैरवर्तन केलं जात होतं. तसेच तिला अनेकदा त्रासही देण्यात आला होता. यामुळे महिला शिक्षिकेनं गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या या आत्महत्येमागचं खरं कारण समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिला त्रास सहन करावा लागला होता, नंतर तिच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. नेमकं हे प्रकरण काय आहे हे पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...
दोन सहकारी शिक्षकांकडून महिलेलाचा छळ
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडल्याचं वृत्त आहे. मृत महिलेच्या पतीने 20 सप्टेंबर रोजी आदिबाटला पोलीस ठाण्यात दोन पुरुषांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटलं की, शाळेतील हे दोन सहकारी शिक्षक काही महिन्यांपासून पत्नीला त्रास देत होते आणि तिच्याशी गैरवर्तन करत होते. हे लक्षात घेता महिलेच्या पतीने यापूर्वीही त्यांना फोनवरून संपर्क साधत चौकशी केल्यानंतरही छळ वाढतच गेला.
पीडितेचा पती हा आसामचा रहिवासी आहे आणि सध्या तो व्यवसायानिमित्त तिकडेच असतो. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण, नंतरच्या काळात दोघेही हैदराबाद येथे एकत्र राहू लागले होते. जेव्हा तो 15 सप्टेंबर रोजी आसामला गेल्यानंतर पत्नीसोबत वाईट घटना घडू लागल्या होत्या. याच मानसिक तणावातून महिलेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
हे ही वाचा : लेकीनं आपल्याच आईला आणि वडिलांना हत्येच्या आरोपाखाली अडकवले, क्राइम पेट्रोल पाहून 'त्या' गोष्टीसाठी कट रचत..
संबंधित प्रकरणात मृत महिलेचं पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आत्महत्येस गुन्ह्यास प्रवृत्त केले. दोन्ही आरोपी शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची कसून चौकशी केली.