पती-पत्नीने 3 वर्षाच्या मुलीसह गळफास घेत संपवलं जीवन, नागरिकांनी सांगितलं 'ते' कारण

मुंबई तक

crime news : पती-पत्नीसह मुलींने मिळून गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाने परिसर हादरून गेला. रहिवाशांनी सांगितलं की, मुलीच्या आजारामुळे कुटुंबीय त्रासलेले होते, त्यांचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते. यातून कदाचित हा धक्कादायक प्रकार घडला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीसह मुलींने मिळून गळफास घेत जीवन संपवलं

point

दुसऱ्या दिवशी प्रकरण उघडकीस

Crime News : हरियाणाच्या कुरुक्षेत्र परिसरात 20 एप्रिल 2026 रोजी सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. संबंधित प्रकरण हे जिल्हा वॉर्ड क्र. 20 प्रेम नगर परिसरातील आहे. जिथे पती-पत्नीसह मुलींने मिळून गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाने परिसर हादरून गेला. 

हे ही वाचा : पुणे हादरलं, पोटदुखीचा त्रास अन् तपासणीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली, सुरक्षारक्षकावर बलात्काराचा आरोप

मृतांची ओळख पटली

संबंधित प्रकरणात मृतांची ओळख पटलेली आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख जतिंद्र कुमार (वय 30), पत्नी मंजू (वय 28) आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी आद्विका अशी ओळख सांगितली. पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

तिघेही फासाला लटकलेल्या अवस्थेत

घडलेल्या घटनेनुसार, हे प्रकरण सोमवारी सकाळी 6:30 वाजता घडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघेही फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी ते मृतदेह खाली उतरवले आणि ते मृतदेह रुग्णालयात नेले, नंतर डॉक्टरांनी मृत असल्याची माहिती दिली. नंतर त्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले. 

हे ही वाचा : धाराशिव : ... तू माजलास का?', वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पुतण्याला काकाने संपवलं, जमिनीचा वाद वाईट

रहिवासी नागरिकांनुसार, मुलीच्या आजारामुळे कुटुंबीय त्रासलेले होते, त्यांचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते. मृतक जतिंद्र कुमारचे वडील, महेंद्र सिंह, याचे काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तसेच त्यांची आई बिकी देवी या त्यांच्या कुटुंबातील एकमेव हयात असलेल्या सदस्य आहेत. त्यांना प्रतीक नावाचा एक भाऊ देखील आहे, तो पत्नी आणि मुलांसह कॅनडात राहतो. 
 

हे वाचलं का?