12 वीत 90 टक्के, पण लागली 'ती' वाईट सवय.. IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा राहुलची कुडंली
एका IRS ऑफिसरच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्याच घरात काम करणाऱ्या राहुल नावाच्या नोकराला अटक करण्यात आली आहे. याआधीही त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
12 वीत 90 टक्के, पण लागली 'ती' वाईट सवय..
IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुलची क्राइम कुडंली
IRS Officer Daughter Murder : दिल्लीच्या अमर कॉलनीतील हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, अटक करण्यात आलेला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगड येथील रहिवासी राहुल मीणा याच्याबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. कुटुंबिय आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलला मोबाईलवर 'तीन पत्ती' आणि 'लूडो' सारख्या जुगाराचे व्यसन जडले होते. ऑनलाइन गेममध्ये राहुल लाखो रुपये हारला होता. त्याचे मित्र त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी दबाव टाकत होते. याच पैशांच्या चोरीच्या उद्देशाने तो आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या घरी गेला होता, जिथे त्याने त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.
राहुलच्या बहिणींनी सांगितले की, तो अभ्यासात हुशार होता. त्याला 10 वीत 73 टक्के, तर 12 वीत विज्ञान शाखेत 90 टक्के गुण मिळाले होते. दिल्लीत नोकरी करत असतानाही तो गेममध्ये पैसे हारला होता, त्यामुळे त्याने तिथल्या दुकानदारांकडून आणि इतर लोकांकडून पैसे उधार घेतले होते. ही बाब जेव्हा आयआरएस अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते.
दिल्लीच्या पॉश अमर कॉलनीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी राहुल मीणाला दिल्लीतूनच अटक केली आहे. या दरम्यान, अलवरमध्ये राहुलच्या कुटुंबियांनी 'आज तक'शी बोलताना मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, राहुलला 12 वी पासूनच ऑनलाइन गेमचे व्यसन लागले होते. तो खेळासाठी आपली मार्कशीट, मोबाईल, बाईक आणि घरातील वस्तूही गहाण ठेवायचा किंवा विकायचा.
राहुलच्या कुटुंबियांनी काय सांगितले?
राहुलचे वडीलही दिल्लीत आयकर विभागात आणि अधिकाऱ्यांच्या घरी काम करायचे. त्यांनी आपल्या जागी मेव्हण्याला नोकरीवर लावले होते आणि त्याच ओळखीने राहुलला एका अधिकाऱ्याच्या घरी नोकरी मिळाली होती. राहुल गेल्या 8 महिन्यांपासून त्या घरात काम करत होता, त्यामुळे त्याला घराची इत्थंभूत माहिती होती. तिथेही तो दिवसभर जुगार खेळायचा. त्याने लोकांशी उधारी केली होती, ज्यावरून वादही झाले होते. लोकांच्या तक्रारीनंतर त्याला नोकरीवरून काढण्यात आले.









