13 वर्षीय मुलीने 67 वर्षीय आजोबाला संपवलं, असं घडलं तरी काय?
Crime News alappuzha : केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात 67 वर्षीय शिवनकुट्टी यांच्या हत्येप्रकरणी 13 वर्षीय मुलीसह चार अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येनंतर घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
13 वर्षीय मुलीने 67 वर्षीय आजोबाला संपवलं
असं घडलं तरी काय?
Crime News Alappuzha : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरिपडच्या करुवट्टा परिसरात 67 वर्षीय शिवनकुट्टी यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. या प्रकरणात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसह चार अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवनकुट्टी हे परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत होते. घटनेच्या वेळी ते घरात एकटे होते. त्यांचा मृतदेह घराच्या आत आढळून आला. त्यांचे हात-पाय बांधलेले होते आणि गळ्याभोवती कापड घट्ट बांधलेले होते. घरातून सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याचे तपासात समोर आले.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : कड्यावरून मुलाची आत्महत्या, वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही मारली उडी..VIDEO
फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सुरुवातीला ही घटना चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने झालेली हत्या असावी, असा पोलिसांचा संशय होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना एका 13 वर्षीय मुलीच्या कथित भूमिकेबाबत माहिती मिळाली. पोलिसांच्या आरोपानुसार, मृत शिवनकुट्टी हे त्या मुलीचे नातेवाईक होते. हत्या करण्याच्या कथित कटात तिची महत्त्वाची भूमिका होती. तिने इतर अल्पवयीन आरोपींना शिवनकुट्टी यांच्या घराचे ठिकाण आणि त्यासंबंधी आवश्यक माहिती दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
हेही वाचा : हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक
