मालकाचा बदला घेण्यासाठी ड्रायव्हरने मुलाचं केलं अपहरण, खोलीत नेत विटेसह चाकूने हल्ला करत संपवलं

मुंबई तक

Crime News : ड्रायव्हरने मालकाचा बदला घेण्यासाठी त्याच्या लहान मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदला घेण्यासाठी ड्रायव्हरने मालकाच्या मुलाचा केला खून

point

नेमकं काय घडलं?

Crime News : ड्रायव्हरने मालकाचा बदला घेण्यासाठी त्याच्या लहान मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिल्लीतील नरेल परिसरात मंगळवारी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कसल्या तरी बदल्यातूनच लहान मुलाचा खून केल्याचा पोलिसांना संशय बळावला गेला आहे.

हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यावर रानगव्याचा हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत सोडलंच नाही, अखेर... हादरवणारा प्रकार

नेमकं काय घडलं? 

दिल्लीतीव नरेला परिसरात 3 वर्षाच्या मुलावर विट आणि चाकूने हल्ला करत हत्या करण्यात आली. मुलाचं नाव तेजस असे आहे. अधिकाऱ्याने संबंधित प्रकरणात माहिती दिली की, मंगळवारी दुपारी लहान मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यानंतर खेळताना लहान मुलगा अचानकपणे घटनास्थळावरून गायब झाला. 

मुलगा घरी न परतल्याने कुटुंबियांनी आणि नागरिकांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या लहान मुलाचा मृतदेह एका दुकानदाराच्या खोलीत आढळला. नीटू हा मृत मुलाच्या वडिलांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 

या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, गाडी मालकाने आपल्या गाडीवर दोन ड्रायव्हर कामावर ठेवले होते. ते दोन ड्रायव्हर नीटू आणि वसीम अशी त्यांची नावे आहेत. त्या दोन ड्रायव्हर एकमेकांमध्ये भीडले. तेव्हा त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गाड्यांचा मालक घटनास्थळी दाखल झाला. तेव्हा त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आणि नीटूला तीन ते चार कानशिलात लगावल्या.  

हे वाचलं का?

    follow whatsapp