विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने...
Crime News : विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे

अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने जाळलं
Crime News : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनले असले तरी महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. मध्य प्रदेशातील जबलपूरमधून समोर आलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला आहे की, शेवटी महिलांना घरगुती हिंसा आणि मानसिक छळ किती काळ सहन करावा लागणार आहे?
ही संपूर्ण घटना माढोताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रैंगवां गावातील आहे. येथे 37 वर्षीय शिल्पी तिवारी नावाच्या महिलेने माढोताल पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या पती अरविंद तिवारी, दीर आशुतोष तिवारी आणि जाऊ शांतिबाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
शिल्पी तिवारी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा पहिला विवाह बडैयाखेडा पाटनचे रहिवासी महेंद्र तिवारी यांच्याशी झाला होता. मात्र, सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. पहिल्या विवाहातून त्यांना 15 वर्षांचा एक मुलगा आहे. पतीच्या मृत्यूनंतर जुलै 2025 मध्ये त्यांनी अरविंद तिवारीशी दुसरा विवाह केला.
हेही वाचा : पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पुण्यात युवकावर दोघांकडून कोयत्याने वार