63 वर्षीय औषध विक्रेत्याची हत्या; पोलिसांनी दोघांना उचलताच सूनेचा अँगल समोर!

मुंबई तक

Crime News : कानपूरमध्ये 63 वर्षीय औषध व्यावसायिक विनीत विनोचा यांच्या हत्या प्रकरणाचा 12 तासांत छडा लावल्याचा पोलिसांचा दावा. विशाल गौतम आणि राज किशोर यांना चकमकीनंतर अटक करण्यात आली असून, हत्येमागील कथित कटाचाही तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

63 वर्षीय औषध विक्रेत्याची हत्या;

point

पोलिसांनी दोघांना उचलताच सूनेचा अँगल समोर!

UP Crime News : कानपूरमध्ये 63 वर्षीय औषध व्यावसायिक विनीत विनोचा यांच्या हत्या प्रकरणाचा छडा 12 तासांच्या आत लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत यांच्या येथे काम करणाऱ्या विशाल गौतम याने साथीदार राज किशोर याच्यासोबत मिळून हत्या केली. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी दोघांना घेरले. यावेळी झालेल्या चकमकीत दोघांच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

हेही वाचा : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह; आता पतीने केली पत्नीची हत्या, पोलिसांना स्वतः दिली माहिती

पोलिसांच्या चौकशीत विशालने हत्येमागे कथित कट असल्याचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, विनीत विनोचा यांच्या हत्येसाठी त्यांच्या सुनेकडून सांगण्यात आले होते आणि त्याबदल्यात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या दाव्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींच्या जबाबांसोबतच CCTV फुटेज, कॉल डिटेल आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. हत्येची घटना कल्याणपूर येथील रतन आर्बिट अपार्टमेंटमधील C-104 फ्लॅटमध्ये घडली. विनीत विनोचा येथे कुटुंबासोबत राहत होते.

हेही वाचा : मनोजदादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ; महिलांचा सरकारला थेट इशारा