विवाहित प्रेयसीला अश्लील व्हिडीओ दाखवायचा पंकज, शेवटी अॅसिडने भाजलेला मृतदेहच सापडला!
Crime News : पोलिस तपासात समोर आले की, पंकज गुप्ता याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात त्या तरुणीचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही पंकज तिला त्रास देत होता. पंकजकडे तरुणीचे काही अश्लील व्हिडिओ होते, ज्याचा आधार घेऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. यामुळे तरुणीचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. या जाचाला आणि संभाव्य बदनामीला कंटाळून अखेर तरुणीने आपल्या कुटुंबाला सत्य परिस्थिती सांगितली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहित प्रेयसीला अश्लील व्हिडीओ दाखवायचा पंकज
शेवटी अॅसिडने भाजलेला मृतदेहच सापडला!
Crime News,बलिया (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित प्रेयसीने आपल्या भाऊ आणि भावजयीच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी प्रियकराचा चेहरा अॅसिडने जाळून टाकला होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने या 'मर्डर मिस्ट्री'चा उलगडा करत प्रेयसीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी रोजी रसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहटा गावाजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताचा चेहरा पूर्णपणे अॅसिडने होरपळलेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्रावून मृताची ओळख पटवली. मृत तरुण हा आझमगड येथील रहिवासी पंकज गुप्ता असल्याचे निष्पन्न झाले.
हत्येमागचे कारण: अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंग
पोलिस तपासात समोर आले की, पंकज गुप्ता याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात त्या तरुणीचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही पंकज तिला त्रास देत होता. पंकजकडे तरुणीचे काही अश्लील व्हिडिओ होते, ज्याचा आधार घेऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. यामुळे तरुणीचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. या जाचाला आणि संभाव्य बदनामीला कंटाळून अखेर तरुणीने आपल्या कुटुंबाला सत्य परिस्थिती सांगितली.










