गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा, प्राचार्याने नववीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
Crime News : एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलगी ही इयत्ता नववीत (वय 15) शिक्षण घेत होती. चक्क शाळेच्या प्राचार्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्राचार्याकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
देशात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा
Crime News : एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलगी ही इयत्ता नववीत (वय 15) शिक्षण घेत होती. चक्क शाळेच्या प्राचार्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीची ओळख शाळेचे प्राचार्य ईश्वर रेड्डी अशी समोर आली. ही घटना कर्नाटकच्या चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील आहे. या घटनेनं गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.
हे ही वाचा : शेजारच्या व्यक्तीकडून 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, तक्रार मागे घेण्यास आणला दबाव
मुख्याध्यापकांनी मुलीला खोलीत बोलावून केले गैरवर्तन
पीडितेच्या जबाबानुसार, ही दुर्दैवी घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता घडली होती. जेव्हा पीडित मुलगी शाळेत औषध आणण्यासाठी खोलीत गेली होती, ते औषध नंतर सहावीच्या विद्यार्थ्याला देण्यासाठी गेली. तिने या प्रकरणात आरोप केला की, मुख्याध्यापकांनी तिला खोलीत बोलावले, तिच्याशी गैरवर्तन केले होते. संबंधित प्रकरणात तिने आरोप केला, मुख्याध्यापकांनी तिला घटनेबद्दल कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती.
घडलेल्या घटनेनुसार, विद्यार्थिनीने तिच्या वर्गमित्रांना सांगितलं की, ज्यांनी शिक्षकांना आणि तिच्या पालकांना माहिती दिली होती. एफआरआयनुसार, पालक 27 सप्टेंबर रोजी शाळेत गेले, त्यांना या घटनेची माहिती मिळाली आणि नंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी भरसभेत भाजपच्या मतांची काढली आकडेवारी, सहा महिन्यात 'एवढी' मते
देशात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
देशभरात महिला मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटनेनं देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. महिला आणि मुली समाजातच नाही,तर आता कुटुंबातही सुरक्षित नाहीत.
