5 वर्षांपूर्वी बहिणीच्या दीरासोबत पळून गेली होती, पण आता खऱ्या पतीकडे आली अन्..'त्या' मागणीने खळबळ
Crime News : झाशीमधून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकरण समोर आले आहे. पुष्पा नावाची एक विवाहित महिला पाच वर्षांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
5 वर्षांपूर्वी बहिणीच्या दीरासोबत पळून गेली होती
पण आता खऱ्या पतीकडे आली अन्..'त्या' मागणीने खळबळ
Crime News : झाशीतील सुरेंद्र अहिरवार यांच्या आयुष्यात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे घरात लाखो रुपये आले की आनंदाचे क्षण येतात; परंतु सुरेंद्र यांच्या बाबतीत उलट झालं आहे. कारण त्यांच्याकडे आलेल्या जमिनीच्या 20 लाख रुपयांच्या ऐवजावर आता त्यांची पत्नी पुष्पा परत येऊन हक्क मागत आहे. वर्ष 2020 मध्ये कथित प्रियकरासमवेत पळून गेलेली पुष्पा अचानक घरात दाखल झाल्याने या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटलंय.
पाच वर्षांपूर्वी प्रियकरासाठी घर सोडले होते
सुरेंद्र यांचे विवाह मध्य प्रदेशातील पुष्पाशी दहा वर्षांपूर्वी झाले होते. दाम्पत्याला एक मुलगाही आहे. सुरुवातीला संसार सुरळीत चालला, परंतु काही काळानंतर पत्नीच्या वर्तणुकीत बदल दिसू लागला. घरी भांडणे, स्वतःला इजा करण्याचे प्रयत्न, सतत धमक्या अशा घटनांमुळे घरात तणाव वाढला. सुरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये पुष्पा आपल्या बहिणीचा दीर आकाश याच्या संपर्कात आली आणि अचानक मुलाला घेऊन त्या पुरुषासोबत राहायला गेली.
हेही वाचा : आई बाथरूममध्ये गेली, बाहेर येईपर्यंत भावानेच 'त्या' कारणावरून बहिणीचा गळा चिरला
सुरेंद्रने दोन वर्ष पळून गेलेल्या पत्नीची वाट पाहिली
पत्नीच्या परतण्याची आशा ठेवून सुरेंद्रने जवळपास दोन वर्ष वाट पाहिली. गावात पंचायतीही झाल्या पण पुष्पा घरी परतली नाही. शेवटी त्यांना कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करावी लागली. याचदरम्यान अलीकडे सुरेंद्र यांच्या खात्यात जमिनीचे 20 लाख रुपये जमा झाले. आणि याच पैशामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली. पुष्पा अचानक घरात आली आणि “मुलाच्या हक्काचे आठ लाख आणि उर्वरित भरपाई म्हणून माझा हिस्सा” अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मोठा वाद होऊन प्रकरण रक्सा पोलिस ठाण्यात पोहोचले.










