Crime News : अवघ्या 115 रुपयांवरून पेटला वाद अन् थेट मित्रावरच केले सपासप वार!
उत्तर प्रदेश राज्यात गुन्ह्यांचं सत्र लागोपाठ सुरूच आहे. गोरखपूरमध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. अवघ्या 115 रुपयांवरून हत्या झाल्याची ही घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Murder News : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात गुन्ह्यांचं सत्र लागोपाठ सुरूच आहे. गोरखपूरमध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. अवघ्या 115 रुपयांवरून हत्या झाल्याची ही घटना समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर (Gorrakhpur) विभागातील महाराजगंज जिल्ह्यात हा प्रकार घडला. बाहेर अंडी खाल्ल्यानंतर दुकानदाराला केवळ 115 रुपये देण्यावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याचा आरोप आहे. (Crime News Uttar Pradesh Teen killed by Friends After Fight Over 115 Rupees)
ADVERTISEMENT
महाराजगंज जिल्ह्यातील घुघुली गावात ही घटना घडली, जिथे मित्रांसोबत अंडी खाल्ल्यानंतर दुकानदाराला पैसे देण्यावरून वाद झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत मिळणार 9 लाखात घर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वादानंतर तीन मित्रांनी आपला 15 वर्षीय मित्र चंदनवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. यानंतर तिघांनीही मृतदेह कोठीभार परिसरातील अहिरोली गावातील छोटी गंडक नदीच्या काठावरील शेतात लपवून ठेवला. रविवारी (17 सप्टेंबर) सकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे वाचलं का?
Special Parliament Session : मोदीजींना हात जोडून विनंती, सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं
त्यांनी सांगितले की, आरोपींनी चंदनला अहिरोली गावात नेऊन केळीच्या शेतात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या रात्री चंदन घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी शनिवारी (16 सप्टेंबर) दुपारी पोलिसांना माहिती दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT