क्लासमेट, अफेअर आणि MPSC पास झाल्यावर दूर गेली… म्हणून राहुलने केली दर्शनाची हत्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

darshana pawar murder case rahul handore allegedly murdered pune police
darshana pawar murder case rahul handore allegedly murdered pune police
social share
google news

Darshana Pawar Murder : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्याच्या दर्शना पवार हत्याप्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरे या आरोपीला अंधेरीच्या रेल्वे स्टेशनवरून मध्यरात्री अटक केली होती. दर्शनाने वन अधिकारी झाल्यानंतर राहुल पासून दुर राहायला सुरूवात केली होती. त्याचसोबत दर्शनाने राहुलला लग्नासाठीही नकार दिला होता. याच कारणामुळे राहुलने दर्शनाची हत्या केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी 5 पथकं नेमली होती. या पथकाने या हत्येचा उलगडा केला. तसेच दर्शना पवारच्या शरीरावर जखमा आढळल्या होत्या त्यामुळेच 302 अंतर्गत राहुलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(darshana pawar murder case rahul handore allegedly murdered pune police)

एमपीएससीच्या परीक्षेत राज्य़ातून तिसऱ्या आलेली दर्शना पवार 12 जूनला बेपत्ता झाली होती. दर्शना पवार तिच्या मित्र आणि कुटुंबियांना राहुलसोबत राजगढ किल्ल्यावर जात असल्याची माहिती दिली होती. या दिवसानंतर दर्शना पवार घरी परतलीच नव्हती. यानंतर 18 जूनला पोलिसांना राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. या मुलीचे नाव दर्शना पवार होते.दर्शना पवारच्या डोक्यावर आणि शरीरावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती.

दोघेही नात्यात होते…

दर्शना पवार हिच्या मामाचे घर आणि आरोपी राहुल हंडोरेचे घर समोरा समोर होते. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. ग्रॅज्युएशन नंतर दोघांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येण्याचे ठरवले होते. तसेच दोघेही गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दर्शना राज्यातून तीसरी आली

दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरे हे दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. तर दर्शनाने एमपीएससीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. तिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. यानंतर राज्याच्या वनविभागात वर्ग-1 अधिकारी म्हणून नियुक्तीही झाली होती. आरोपी राहुल हंडोरे हा दिवसरात्र एक करून पुण्यात फुड डिलिव्हरी करून एमपीएससीची परीक्षेची तयारी करत होता. आपल्या करीअरसाठी राहुल हंडोरे खुप मेहनत घेत होता. पण त्याला काही यश मिळत नव्हते.

राहुलपासून झाली दुर

दर्शनाची वर्ग-1 अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तिन राहुलपासून दूर राहण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती राहुलच्या मित्रांनी दिली. इतकेच नाही तर दर्शनाने राहुलचा लग्नाचा प्रस्तावही नाकारला होता. यामुळे तो खुपच संतापला. यामुळेच राहुल तिला ट्रॅकिंगच्या बहाण्याने राजगड किल्ल्यावर घेऊन गेला आणि तिचा खुन केला.

ADVERTISEMENT

आरोपीची गुन्ह्याची कबुली

दर्शना पवार हत्याप्रकरणानंतर आरोपी हा फरार होता. आरोपी हा ट्रेनमधून प्रवास करून पोलिसांना चकवा देत होता. आरोपीने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी या दरम्यान प्रवास केला होता. दरम्यान घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आरोपीचे नाव निश्चित झाल्यानंतर पोलिसांची पाच पथक तयार करून शोध सुरु केला होता. शेवटी काल उशीरा रात्री मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला अटक करण्यात आली आहे, तसेच राहुल हंडोरेने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणाचा पुढचा तपास एसडीपीओ हवेली करीत आहेत. आता या प्रकरणात आरोपीने हा गुन्हा कसा केला? घटनाक्रम काय होते? या हत्येमागचं कारण काय होतं? या सर्व गोष्टी चौकशीत समोर येणार आहेत. तसेच आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहोत. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येणार आहेत, अशी माहिती अंकीत गोयल यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT