‘तो’ Video पाहिला, 700 किमी प्रवास करत आला अन् घटस्फोट घेतलेल्या बायकोला…
दक्षिण अमेरिकेत एका व्यक्तीने तब्बल 700 किमीचा प्रवास करुन आपल्या घटस्फोटीत पत्नीची हत्या केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. जाणून घ्या या संपूर्ण घटनेबाबत.
ADVERTISEMENT

एका 29 वर्षीय तरुणीचा अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली. तिच्या हत्येची कहाणी आपल्याला देखील हादरवून टाकेल. सानिया खान (Sania Khan) असं या तरुणीचं नाव आहे. दक्षिण अमेरिकेच्या (South America) टेनेसी राज्यातील चट्टानूगा शहर (Chattanooga city of Tennessee state) ती राहत होती. 2016 साली सानियाची जॉर्जिया येथील राहिल अहमद या व्यावसायिकाशी भेट झाली. मात्र, राहिल हा मूळचा पाकिस्तानचा होता. त्या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले आणि 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जून 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यानंतर सानिया फोटोग्राफर म्हणून काम करायची. इतकेच नाही तर याआधी तिने एअर होस्टेस म्हणूनही काम केले होते. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध होती. (dating marriage divorce husband angry wife tiktok video 700 km away and killed her crime news)
तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज सुरू केले होते. टिकटॉकवर तिला 20 हजारांहून अधिक लोक फॉलो करायचे. पण वयाच्या 29व्या वर्षी ही तरुणी इतक्या लवकर जगाचा निरोप घेईल, याचा कुणी विचारही केला नव्हता.
वास्तविक, 18 जुलै 2022 रोजी सानियाची पती राहिल अहमदने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. अखेर दोघांमध्ये असे काय घडले की पतीनेच पत्नीची हत्या करून आत्महत्या केली. जाणून घेऊया सविस्तर…