Crime : बापाच्या प्रेम प्रकरणाची मुलाला शिक्षा, प्रेयसीने गळा आवळून…घटनेने शहर हादरलं
नवी दिल्लीच्या इंद्रपुरीत 11 वर्षाच्या दिव्यांश उर्फ बिट्टूच्या हत्येची घटना घडली होती. या हत्याकांडात आता मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी तीन दिवस तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी पुजाला अटक केली आहे. आरोपी पुजा ही मृत मुलाच्या वडिलांची प्रेयसी आहे. आरोपी पुजाला बक्करवाला परीसरातून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्लीच्या (New Delhi) इंद्रपुरीत 11 वर्षाच्या दिव्यांश उर्फ बिट्टूच्या हत्येची घटना घडली होती. या हत्याकांडात आता मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी तीन दिवस तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी पुजाला अटक केली आहे. आरोपी पुजा ही मृत मुलाच्या वडिलांची प्रेयसी आहे. आरोपी पुजाला बक्करवाला परीसरातून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी पुजाने दिव्यांशच्या हत्येची कबुली दिली आहे. आता वडिलांच्या प्रेयसीने मुलाची हत्या का केली? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच हे संपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात.(delhi indrapuri 11 year old boy divyansh murder case crime story)
ADVERTISEMENT
3 वर्ष लिव्ह इन रिलेशन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांचे एक कुटुंब आहे. या कुटुंबात त्यांची एक बायको आणि मुलगा दिव्यांश होता. या लग्नाच्या काही वर्षानंतर जितेंद्र पुजाच्या नावाच्या तरूणीसोबत 2019 साली नात्यात आले होते. हे नाते अधिकृत करण्यासाठी जितेंद्र यांनी पुजासोबत 17 ऑक्टोबर 2019 ला आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते. तसेच ते कोर्ट मॅरेज देखील करणार होते. मात्र जितेंद्रचे तलाकच झाले नसल्याने कोर्ट मॅरेजसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे जितेंद्रने तलाक झाल्यानंतर कोर्टात लग्न करण्याचे आश्वासन पुजाला दिले होते. जितेंद्रच्या या शब्दावर विश्वास ठेवून पुजाने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायला सुरूवात केली.
असा रचला कट
2019 पासून तब्बल 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जितेंद्रच्या तलाकवरून दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. आणि या नात्याला कंटाळून जितेंद्रने पुन्हा आपल्या बायको आणि मुलासोबत राहायला सुरूवात केली. या गोष्टीवरून पुजा जितेंद्रवर नाराज होती. आणि तिला त्याच्याकडून बदला देखील घ्यायचा. या दरम्यान जितेंद्र त्याचा मुलगा दिव्यांशमुळे लग्नास नकार देत होता अशी माहिती पुजाला मिळाली होती. त्यामुळेच पुजाने आपल्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी दिव्यांशच्या हत्येचा कट रचला होता.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Crime News : बायकोची साडी चोरली, त्याने शेजाऱ्याला गोळ्याच घातल्या
बेडमध्ये लपवला मृतदेह
पुजाने 10 ऑगस्टला एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने जितेंद्रच्या घरचा पत्ता मिळवला आणि त्याचे घर गाठले. पुजा जितेंद्रच्या घराजवळ पोहोचताच घराचा दरवाजा उघडा होता आणि दिव्यांश बेडवर झोपला होता. याच संधीचा फायदा उचलून पुजाने झोपलेल्या दिव्यांशची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर पुजाने दिव्यांशचा मृतदेह बेडमध्ये लपवून घटनास्थळावरून पळ काढला होता. विशेष म्हणजे या हत्येनंतर पुजाने जितेंद्रला फोन करून ‘तुझी सर्वांत मौल्यवान वस्तु मी हिसकावली’ असल्याची माहिती दिली होती. जितेंद्रला सुरूवातीला तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही,पण घरी गेल्यावर प्रेमापायी आपला मुलगा गमावल्याची त्याला कल्पना आली.
300 सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध
पोलिसांना दिव्याशच्या हत्येनंतर आरोपीचा शोध सुरु केला होता. यासाठी पोलिसांनी तब्बल 3 दिवस कसून तपास करून 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या तपासात संशयित आरोपी आढळून आली होती.पोलिसांनी या संशयीताचा शोध घेतला आणि अखेर बक्करवाला परीसरातून पुजाला अटक केली. पुजाला अटक केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली. जितेंद्रला हा सर्व प्रकार कळताच त्याला मोठा हादराच बसला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sana Khan Bjp : भाऊ म्हणाला ‘ही सना खान नाही’, मग ‘तो’ मृतदेह कुणाचा?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT