लेडी कॉन्स्टेबलचा दाबला गळा, नाल्यात फेकली बॉडी अन् फेक कॉल…; गूढ उलगडल्यावर पोलिसांनाही फुटला घाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman constable murder in delhi investigation started after two years. After the murder of a woman family was searching for, the same policeman killed her out of unrequited love
woman constable murder in delhi investigation started after two years. After the murder of a woman family was searching for, the same policeman killed her out of unrequited love
social share
google news

Lady Constable Murder: दिल्लीत गुन्हेगारीचे (Delhi crime) प्रमाण वाढत असतानाच गुन्ह्याचेही अनेक प्रकार समोर येताना दिसून येत आहेत. कारण दोन वर्षापूर्वी दिल्लीतील महिला कॉन्स्टेबलच्या झालेल्या हत्येचा तपास लागल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणातील सगळ्यात मोठी धक्का देणारी बाब कोणती असेल तर हत्या करणारा दुसरा तिसरा कुणी नसून महिला पोलिसाबरोबर काम करणारा हेड कॉन्स्टेबलच (Head Constable) आहे. त्याही पुढं जाऊन तिची हत्या (Murder) झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांबरोबर हाच पोलीस त्यांची दिशाभूल करत राहिला. (delhi lady constable murder strangulated death in body dumped in drain)

ADVERTISEMENT

नोकरी एकाच विभागात

महिला पोलिसाची हत्या करणारा सुरेश राणा हा 2012 मध्ये दिल्ली पोलिसांच्या पीसीआर विभागात भरती झाला होता. तर त्यानंतर महिला कॉन्स्टेबल मोना 2014 मध्ये दिल्ली पोलिसात भरती झाली. पीसीआर युनिटमध्येच या दोघांची ओळख झाली, आणि ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आली. मोना ही सुरेश राणाला डॅडी म्हणायची. मात्र मोनावर सुरेश राणाचे एकतर्फी प्रेम होते असं पोलिसांनी आता स्पष्ट केले.

हे ही वाचा >> धक्कादायक! पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचं आधी अपहरण, नंतर…

मोनाची UPSC साठी तयारी

मोना अभ्यासातही हुशार होती. त्यामुळे तिची उत्तर प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यानंतर तेथील राजीनामा देऊन ती यूपीएससीची तयार करु लागली. तिचे स्वप्न आएएस किंवा आयपीएस होण्याचे होते. त्यानंतर सुरेश राणाने तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली. त्याला मोनाने विरोध केला होता. त्यानंतर त्याने 8 सप्टेंबर 2021 रोजी त्याने मोनाला आपल्या अलीपूरमधील घरी घेऊन गेला. त्यावेळी त्या घरातच त्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मोनाचा मृतदेह मोठ्या नाल्यात फेकून दिला.

हे वाचलं का?

कुटुंबीयांची दिशाभूल

सुरेश राणाने तिची हत्या करुन तिच्या कुटुंबीयांचे सात्वंन करत तो त्यांना ती कुठेतरी बेपत्ता झाल्याचे सांगत राहिला. त्यांच्यासोबत पोलीस तक्रार करण्यात पुढाकार घेत, त्याने तिला शोधण्याचे नाटकही केले. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास दिरंगाई केली म्हणून त्याने किती तरीवेळा पोलिसांवर तो चिडला होता.

मोनाचे बँक खाते चालूच

सुरेश राणाने आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने एका मुलीच्या साहाय्याने मोनाचे कोरोना लस घेतल्याचेही प्रमाणपत्र बनवले होते. तर ती जिवंत असल्याचे भासवण्यासाठी तो तिच्या अकाऊंटवरून बँक खात्याचा व्यवहारही करत होता. तिचा मोबाईल त्याच्याकडेच असल्याने तो तिच्या सिमकार्डवरून फोन करुन तो खोटी माहितीही तो कुटुंबीयांना देत होता. मोबाईलमुळे फोनच्या लोकेशननुसार कुटुंबीयांना घेऊन तो तिथं जात होता. त्यामुळे मोनाच्या कुटुंबीयांनाही त्याच्यावर विश्वास ठेवावा लागायचा. तर आरोपी सुरेंद्रचा मेहुणा रॉबिन, अरविंद नावाने, मोनाच्या घरच्यांना फोन लावत होता.

ADVERTISEMENT

जुने रेकॉर्डिंग

तेव्हा तो मोनाचे कुटुंबीय मोनाशी बोलायला सांगायचे, तेव्हा रॉबिन मोनाच्या आवाजाचे जुने रेकॉर्डिंग लावायचे त्यामध्ये मोना म्हणायची की, आई तू विनाकारण काळजी करु नकोस. मी व्यवस्थित आहे, माझा शोध घ्यायच्या भानगडीत पडून नका असे नाटक करुन त्याने कुटुंबायांचे दोन वर्षे दिशाभूल केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> “आम्हाला चिरडून टाका, आर्मी बोलवा, पण…”, शिंदेंना चँलेज, संजय राऊत का संतापले?

फोनमुळे शोध लागला

या प्रकरणात स्थानिक पोलिसांचाही मोठा निष्काळजीपणा समोर आल्याने मोनाच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास दोन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यामध्यो पोलिसांनी सर्वप्रथम तपास केला तो नंबर रॉबिन ज्या नंबरवरून अरविंद म्हणून कॉल करत असे.त्या फोनवरुच हत्येचे रहस्य उघडले. तो राजपाल पवनचा मित्र निघाला होता

कॉल गर्ल्सचा केला वापर

मोना जिवंत असल्याचे नाटक करण्यासाठी सुरेंद्रचा मेहुणा रॉबिन कॉल गर्ल्ससोबत हरियाणा, डेहराडून, मसुरीसारख्या ठिकाणी घेऊन जाऊन तिथून मोनाच्या आवाजात बोलण्याचे नाटक केले जायचे. ज्या ज्या ठिकाणी जायचे असेल त्या त्या ठिकाणी मोनाचीच कागदपत्रे वापरली जायची. मसुरीत त्याने जाणीवपूर्वक मोनाची कागदपत्रं हॉटेलवर सोडून हॉटेलवाल्यांनी मोनाचे कागदपत्र सापडली म्हणून फोन केला. त्यावेळी तिथे पोलीस गेले होते. त्यावेळी मोनाला घरी जायचेच नसेल असंही पोलिसांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. हॉटेलवर कागदपत्र सापडल्यामुळे कुटुंबीयांनाही ती जिवंत असल्याचे पटले.

मोनाच्या मृतदेहाचा सांगाडा

सुरेश राणाने पोलीस अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्यात पटाईत झाला होता. मात्र एकदिवस त्याचा तो खेळ फसला, आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याने मोनाची हत्या केल्याचे सांगून तिचा मृतदेह नाल्यात टाकल्याचे सांगितले. त्यानंतर नाल्यातीलही सांगडा पोलिसांनी ताब्यात घेऊन तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून कुटुंबीयांचे डीएनए घेऊन आता त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT