मुलाच्या प्रेयसीला भर रस्त्यात केलं विवस्त्र, महिला सरपंचाचं तालीबानी कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Divorced woman beaten naked by female sarpanch in Tapi district of Gujarat
Divorced woman beaten naked by female sarpanch in Tapi district of Gujarat
social share
google news

Gujarat Crime: गुजरातमधील तापीमध्ये एका महिला सरपंचाने घटस्फोटीत महिलेला तालिबानीसारखी शिक्षा दिली आहे. ज्या महिलेला शिक्षा देण्यात आली आहे त्या महिलेची एकच चूक झाली की, ती महिला सरपंचाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. मात्र ती महिला सरपंच सुनिताच्या मुलाचेही त्या महिलेवर प्रेम (Love Affairs) होते. घटस्फोटीत महिला (divorced woman) आणि तो मुलगा दोघंही एकत्र राहत होती. त्या रागातूनच महिला सरपंचाने त्या महिलेवर सूड उगवला आहे. आपल्या मुलाबरोबर राहत असलेल्या त्या घटस्फोटीत महिलेला सरपंच (Women Sarpanch) महिलेने आधी मारहाण केली व नंतर तिला विवस्त्रही (naked) करण्यात आले होते. या घडलेल्या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

बदमनामीसाठी केलं कृत्य

पीटीआयच्या वृत्तानुसार गुजरातमधील तापी जिल्ह्यात एका महिला सरपंचाविरुद्ध तिच्या मुलाच्या प्रेमात असलेल्या एका घटस्फोटीत महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याप्रकरणी महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. ते त्यांच्या मुलाने घरातही सांगितले होते. मात्र घराच्यांच त्याला विरोध होता. त्यामुळेच महिला सरपंचाने महिलेला अद्दल घडविण्यासाठी तिला विवस्त्र करुन मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >> Crime : मुलगा होता बेपत्ता, कुटुंब शोधत शेतात पोहोचलं अन् मातीचा ढीग… पोलिसांना फुटला घाम

मारहाण करुन केलं विवस्त्र

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, महिला सरपंचाने मुलाचे ज्या महिलेवर प्रेम होते, तिला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याप्रकरणी महिला सरपंचासह पती आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपींना कोणालाही अटक केली गेली नाही.

हे वाचलं का?

मुलगा घटस्फोटीतेच्या प्रेमात

पोलीस निरीक्षक एन.एस. चौहान म्हणाले की, तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यामधील बोरखडीच्या सरपंच सुनिता चौधरी मुलाच्या प्रेमाविरोधात होत्या. तो ज्या घटस्फोटीत महिलेच्या प्रेमात होता व तिच्यासोबत राहत होता. त्याप्रकरणी त्या आधीच रागात होत्या. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, घटस्फोटीत महिलेबरोबर सरपंचाचा मुलगा राहत होता. त्या रागातूनच सुनिताने त्या महिलेला आधी मारहाण केली आणि नंतर तिला विवस्त्र करण्यात आले. या प्रकरामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा >> Pune: ठोसा मारताच मोडलं नाक अन्… दुबईत बर्थडे करायचा होता पतीने नकार देताच महिलेचं जीवघेणं कृत्य!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT