स्वस्तात आयफोन घेणं पडलं महागात, पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई तक

ADVERTISEMENT

fake iPhone sale under branded name dindoshi police arrested
fake iPhone sale under branded name dindoshi police arrested
social share
google news

Fake iPhone sale under branded name Police Exposed : ब्रॅंडेड आयफोनच्या नावाखाली डुप्लिकेट आय़फोन (Duplicate Iphone) विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police) मोबाईल डेटाच्या आधारावर या तीनही आरोपींना अटक केली आहे. हे तीनही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी होती. या आरोपींकडून 47 हजार रूपयांची रोकड आणि 20 हजार किंमतीचा डुप्लिकेट आय़फोन जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. (fake iPhone sale under branded name dindoshi police arrested three people)

ADVERTISEMENT

दिंडोशी पोलिस (Dindoshi Police) ठाण्यात नकली आयफोन विकल्याच्या दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशीच प्रकरणे मुंबईच्या पोलीस ठाण्यातही दाखल आहेत.त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. दिंडोशी पोलिसांनी मोबाईल डेटाच्या आधार घेत आरोपींची ओळख पटवली होती.त्यांनंतर या आरोपींचा शोध घेऊन तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले होते. अहमद गुलफाम अहमद (21) अदिल नबाब अहमद (23) आणि अहमद नबाब शमीम अहमद (32) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी उत्तरप्रदेशच्या मेरठचे रहिवाशी आहेत.

हे ही वाचा: …अन् त्याने गाठला क्रूरतेचा कळस! मुलीचा गळा दाबला, पत्नीचं कापल नाक

असा घालायची गंडा

ब्रॅंडेडच्या नावाखाली डुप्लिकेट आय़फोन (Duplicate Iphone) विकणारी ही टोळी भारतातील मोठ-मोठ्या शहरातील आयटी पार्क, कमर्शियल प्लेस ठिकाणावर जायची.या ठिकाणावरू जाऊन ही टोळी स्वत:ला हायप्रोफाईल भासवून नागरीकांना विश्वासात घेऊन दीड लाखाचा आयफोन फक्त 70 ते 90 हजार रूपयात विकायची. इतका महागडा आय़फोन स्वस्तात मिळत असल्याने अनेक जण आरोपींच्या आमिषाला बळी पडायचे. याच आमिषातून या आरोपींनी देशभरातील अनेक नागरीकांना डुप्लिकेट आयफोन विकून फसवणूक केली होती. देशातील मुंबई, बंगळुरु, मेरठ, बिहार आणि झारखंड यासारख्या मोठ्या शहरात जाऊन ही टोळी नागरीकांची फसवणूक करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

दिंडोशी पोलिसांनी डु्प्लिकेट आय़फोन विकणाऱ्या मेरठ गँगच्या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.अहमद गुलफाम अहमद (21) अदिल नबाब अहमद (23) आणि अहमद नबाब शमीम अहमद (32) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी उत्तरप्रदेशच्या मेरठचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून 2 नकली आयफोन आणि 47 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.

हे ही वाचा: पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT