सासऱ्याने सुनेचं मुंडकंच केलं धडावेगळं, क्रूर हत्येमागचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

father-in-law's killed daughter-in-law family dispute agra uttar pradesh crime story
father-in-law's killed daughter-in-law family dispute agra uttar pradesh crime story
social share
google news

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील अछनेरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सासऱ्याने कौटुबिक वादातून सुनेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुनेला वाचवायला गेलेली मोठी सुन देखील गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (father-in-law’s killed daughter-in-law family dispute agra uttar pradesh crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मलिकपुर गावचे रहिवासी रघुवीर सिंह त्यांच्या दोन सुना आणि छोट्या मुलासोबत राहतात. रघुवीर यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर छोटा मुलगा गौरव हा फर्रुखाबादमध्ये पोलिस कॉस्टेबल या पदावर कार्यरत आहे. रघुवीर मंगळवारी घरी आले त्यावेळी त्यांची लहान सुन प्रियंका जेवण बनवत होती. या दरम्यान रघुवीर आणि सुन प्रियंका यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. याच वादातून संतप्त होत रघुवीर यांनी कुऱ्हाडीने सुनेवर वार करून तिची हत्या केली. या दरम्यान प्रियंकाला वाचवायला रघुवीर यांची मोठी सुन देखील आली होती, मात्र ती देखील गंभीर जखमी झाली होती.

हे ही वाचा : Crime : बहिणीसोबत होते संबंध, कंडोमच्या पाकिटाने कसं सोडवलं हत्येचे गूढ?

या घटनेनंतर आरोपी रघुवीर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह घराच्या दरवाज्यावर बसला आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना घटनेची माहिती देऊ लागला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यासोबतच प्रियंकाच्या कुटुंबियांना देखील कळवले होते. प्रियंकाच्या हत्येची मिळताच तिच्या कुटुबियांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह दिला. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच प्रियंकाच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी रघुवीरला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोनम कुमार यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

याआधी बीडमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने (father-in-law) गर्भवती सुनेला (daughter-in-law) ठार मारून स्वतःच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने बीड (Beed) जिल्हा हादरला होता. या प्रकरणात आता 3 वर्षानंतर सासरा बालाजी लव्हारेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

हे ही वाचा : Crime : पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीनं केलं अत्यंत भयंकर कृत्य

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT