Crime : मुलीच्या तोंडात कापड टाकून टॉयलेट क्लिनरने जाळलं… : अंगावर शहारे आणणारं वडिलांचं कृत्य
वडिलांनी आणि त्यांच्या जावयाने मुलीच्या तोंडात कपडा भरून तिला बेदम मारहाण केली. यानंतर केमिकल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे वडिलच पोटच्या मुलीच्या आयुष्यावर उठले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केमिकलने मुलीचे शरीर जाळून टाकण्यात आले, तसंच तिच्या तोंडातही केमिकल टाकले होते. यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून वडिलांना मदत करणाऱ्या जावयालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (father tried to kill the girl by burning her with toilet cleaner)
ADVERTISEMENT
याबाबत वडिलांनी पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार मिळालेली अधिक माहिती अशी की, एका वर्षापूर्वी संबंधित मुलगी गावातील एका मुलासोबत पळून गेली होती. काही दिवसांनी परतही आली. मात्र यामुळे गावात तिच्याविषयी चर्चा सुरु झाली. त्यानंतरही संबंधित युवक आणि युवती भेटत होते. यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी होतं होती. अशातही 22 एप्रिल रोजी तिचे लग्न लावून दिले. यानंतरही ती तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती. यामुळेच आपण हे पाऊल उचलले.
हे ही वाचा : Crime : डोकं जमिनीवर आपटलं, पोटात लाथा-बुक्क्या… नणंद अन् सासूने घोटला सुनेचा गळा
दरम्यान, 24 एप्रिल रोजी वडील आणि त्यांचे जावई मुलीचे सासरच्या घरी पोहोचले. रात्री तिथेच मुक्काम केला. यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीला घरी आणत असताना वाटेत वडिलांनी आणि त्यांच्या जावयाने मुलीच्या तोंडात कपडा भरून तिला बेदम मारहाण केली. यानंतर केमिकल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिला मरणासाठी रस्त्याच्या बाजूला फेकून दिले.
हे वाचलं का?
25 एप्रिलला रस्त्याच्या बाजूला आढळली मुलगी :
याबाबत पोलीस उपाधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, 25 एप्रिल रोजी एक मुलगी रस्त्याच्या बाजूला अत्यावस्थ स्थितीमध्ये पडली असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तिला रुग्णालयात दाखल केले. तिचे शरीर आणि तोंड जळल्याचं दिसून येत होतं. तिच्या अंगावर फार कमी कपडे होते. या दरम्यान, शुद्धीवर येताच डॉक्टरांना एका कागदावर मुलीने तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.
हे ही वाचा : भयंकर बदला अन् शारजाहचे तुरुंग : क्रिशन परेराची अटक ते सुटका, एका महिन्यात काय घडलं?
मुलीच्या वडिलांनी दिली तक्रार :
दरम्यान, मुलगीबाबत वडिलांनीच तक्रार दिली होती. मात्र तपासात मुलीच्या नातेवाईकांच्या म्हणण्यात विरोधाभास आढळून आला. मुलीच्या सासरच्या मंडळींकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, पीडितेला तिच्या नातेवाईकांनी 24 एप्रिल रोजी घेऊन गेले होते. यानंतर वडिलांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. मारहाणीनंतर दुकानातून टॉयलेट क्लीनर घेऊन तो चेहऱ्यावर आणि अंगावर ओतले असल्याची माहिती त्यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT