Girl Murder : परीक्षा देऊन निघाली होती घरी, भरबाजारात दोन तरुणांनी…
बीएचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा जीवच गेला. परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीची मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी भर बाजारात गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पिस्तुल घटनास्थळी टाकून फरार झाले.
ADVERTISEMENT

अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशची चर्चा पुन्हा एकदा देशभरात झाली. त्याच उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था हा केंद्रस्थानी आली आहे. उत्तर प्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडली असून, परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीला दोन तरुणांनी भयंकर पद्धतीने संपवलं.
उत्तर प्रदेशातील जालौनमधील केईटी तालुक्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. यात बीएचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा जीवच गेला. परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीची मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी भर बाजारात गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पिस्तुल घटनास्थळी टाकून फरार झाले.
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी तरुणीची गोळ्या घालून हत्या केली, ते ठिकाण पोलीस ठाण्यापासून जवळच होतं. ही तरुणी इट ठाणे हद्दीत येणाऱ्या अंधागावची होती. 22 वर्षीय रोशन अहिरवार सोमवारी (17 एप्रिल) ईटीच्या राम लखन पटेल कॉलेजमध्ये बीएची परीक्षा देण्यासाठी आली होती.
हेही वाचा >> राष्ट्रवादीच्या मेळाव्याला अजितदादांची गैरहजेरी ‘हे’ आहे कारण
परीक्षा देऊन झाल्यानंतर रोशनी घरी निघाली होती. त्याचवेळी बाईकवरून दोन तरुण आले. त्यांच्याकडे पिस्तुल होते. त्यातील एका तरुणाने पिस्तुलातून रोशनीवर डोक्यात गोळी झाडली. ज्यामुळे रोशनी जागेवरच गतप्राण झाली.










