लग्न घरी रक्ताचा सडा! नवरदेव-नवरीच्या गळ्यावर फिरवला चाकू, 5 जणांना झोपेतच संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

five family member brutal murder including bride and groom mainpuri news uttar pradesh
five family member brutal murder including bride and groom mainpuri news uttar pradesh
social share
google news

उत्तरप्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. लग्नघरात ही भयानक घटना घडली आहे. या घटनेत नवरा-नवरीसह त्याचा भाऊ- मेहूना आणि मित्राची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही हत्या करणारा दुसरा कोणी नसून याच कुटुंबातला एक सदस्य होता. या हत्याकांडानंतर आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. उत्तर प्रदेशमध्ये या घटनेने आता हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

मैनपुरी जिल्ह्याच्या किशनी ठाणे परीसरातील गावात शुक्रवारी-शनिवारी एक लग्न सोहळा पार पडला. यामध्ये गावातील सुभाष यादव (65) यांचा लहान मुलगा सोनू यादव याचे गुरुवारी लग्न झाले. या लग्नानंतर नातेवाईक इटावा जिल्ह्याच्या गंगापूरला गेले होते. आणि तिथून त्यांनी नवरीला घरी आणले होते. नवीन नवरी घरी आल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. या दरम्यान लग्न घरातून काही नातेवाईक आपआपल्या घरी निघाले होते, तर काही नातेवाईक लग्नघरातच होते.

मध्यरात्री घडलं भयानक कांड

मध्यरात्री लग्नघरात अचानक रात्री सुभाष यादव यांचा मोठा मुलगा सोहवीर यादवने उठून घराच्या छतावर झोपलेल्या नववधूची धारदार शस्त्राने हत्या केली. यानंतर नवरीच्या बाजूला झोपलेल्या छोटा भाऊ सोनूचीही हत्या केली. यानंतर आरोपी सोहवीरने घरातच्या छतावरून खाली उतरून रूममध्ये झोपलेलो छोटा भाऊ अभिषेक सह मेहुणा रामकृष्ण यादव यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Pune, MPSC: ‘दर्शना पवारला राहुल दीदी, दीदी… बोलयचा’, धक्कादायक माहिती समोर

बायको आणि मामी सुदेवाने बचावल्या…

आरोपी सोहवीर यादव इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याची बायको आणि मामीची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने त्या बचावल्या आहेत. या संपूर्ण हत्याकांडानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपीने साधारण स्वत: च्याच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली, इतर दोघी या हल्ल्यातून बचावल्या नाहीतर मृत्यूच्या आकडा 7 असण्याची शक्यता होती. दरम्यान या दोघींना आता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सोहवीरचे फोटोग्राफरचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे हे दुकान तोट्यात होते. यासाठी तो अनेक जणांकडून पैशाची मागणी करत होता. यावरून मोठा वाद देखील झाला होता, असे वडिल सुभाष यादव यांनी सांगितले आहे. या वादातून त्याने कुटुंबियांतील सदस्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान आरोपी सोहवीरने लग्नासारख्या इतक्या चांगल्या वातावरणात हे भयानक हत्याकांड का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आरोपीने आपल्याच भावांची हत्या का केली? असा सवालही उपस्थित होत आहे. या हत्याकांडानंतर आता पोलिसांनी घटनेची चौकशी करायला सुरुवात केली आहे. या चौकशीत आता हत्येचे कारण समोर येणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Kolhapur : बलात्कार प्रकरण अन् पत्नी, मुलाला पाजले विष; स्वतःचा चिरला गळा!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT