Crime: उधारीमुळे कान गमावला, मित्राने तोडला कानाचा लचका!
मित्राने उधार पैसे दिले नाहीत म्हणून पैसे मागायला आलेल्या मित्राने मित्राच्या कानाचा चावा घेऊन कानाचा लचका तोडला आहे. त्यामुळे मित्रही गंभीर जखमी होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर चावा घेणारा मित्र फरार झाला आहे.
ADVERTISEMENT
Kanpur Crime : उत्तर प्रदेशातील कानपूर सध्या वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत आले आहे. त्यातच गुन्हेगारीच्या कानपूरमध्ये रोज काही ना काही घडत असल्याने फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशाला हादरवून सोडत आहेत. कानपूरमध्ये दोघा मित्रांमध्ये (Friend) झालेल्या वादामुळे कानपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राकडे उधारीने पैसे मागायला गेला होता. त्यावेळी मित्राने त्याला सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत, सोय झाली की तुला नंतर देईन. मात्र मित्राने त्याच्याकडे हट्टच केला. नंतर त्या दोघांमध्ये वादही सुरू झाला, त्यावेळी तू मला पैसै का देत नाहीस म्हणत त्या मित्राने पैसे दिले नाहीत. म्हणून त्याने थेट त्याच्या बरोबर मारामारी (Fighting) करत त्याच्या कानाचा चावा घेतला. तो चावा इतका भयंकर होता की, त्याच्या कानाचे दोन भाग झाले. त्यामुळे हे प्रकरण आता पोलिसात गेले आहे. जखमी मित्राने आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मित्रा मित्रामध्ये वाद
पोलिसांनी सांगितले की, एका मित्राने दुसऱ्या मित्राकडे उधारीने 2 हजार रुपये मागितले होते. ज्यावेळी त्याने उधारीने पैसे मागितले त्यावेळी दुसऱ्या मित्राने त्याला देण्यास नकार दिला. त्याने पैसे देत नाही म्हटल्यावर त्या दोघांमध्ये वाद झाला. पैसे देत नाही म्हणत त्याच्याबरोबर त्याने वाद घातला व पैसे दिले नाहीत म्हणून त्याने मित्राचा कान चावला. कान चावल्याने कानाचे दोन भाग झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. कान चावल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचे कपडे रक्तात माखले होते.
हे ही वाचा>> Assembly Election 2023 : बालमुकुंद ते ओतराम… भाजपच्या चार महंतांचं काय झालं?
कानाच झाले दोन भाग
कान चावल्याने हे प्रकरण पोलिसात गेले. त्यानंतर पोलिसांनी जखमी झालेल्या मित्राला रुग्णलयात दाखल केले. त्यानंतर तुटलेला कान शस्त्रक्रिया करून जोडण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्याने कान चावला होता, त्याचा पोलीस शोध घेत असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
पैशासाठी मित्राचा हट्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कानपूरच्या बाबुपुरवामधील रहिवासी मिलन गुप्ता आणि शुभम यांच्यामध्ये घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 2 डिसेंबर रोजी मिलन गुप्ता एका हॉटेलमध्ये चहा पीत होता. त्यावेळी तिथे शुभम नावाचा मुलगा तिथे आला. शुभमने मिलनकडे उधारीने 2 हजार रुपये मागितले होते. त्यानंतर मिलनने सध्या माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. तरीही शुभमने पैशासाठी त्याच्याकडे हट्ट धरला. हट्ट धरल्याने शुभम आणि मिलनमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. मारामारी करताना शुभमने मिलनच्या कानाचा चावा घेतला आणि त्याचा कानच तुटला. त्यातच दोघांमध्ये हाणामारी झाल्याने मिलन जखमी झाला होता. त्यानंतरही त्याला धमकी देऊन त्याने तिथून पळ काढला. ही घटना पोलिसात गेल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करून मिलनच्या कानाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मिलनच्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शुभमचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा>> BJP Maharashtra : भाजपचे नेते भिडले, पक्षाच्या विधानसभा प्रमुखालाच मारले; व्हिडिओ व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT