2 दशकाच्या गुंडगिरीचा एका मिनिटात भयानक अंत.. अतीक-अशरफच्या हत्येपर्यंतची संपूर्ण कहाणी
Atiq Ahmed and Ashraf Ahmed Murder: उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पण या हत्येमागे तब्बल 2 दशकांचा इतिहास आहे. तोच जाणून घेऊया सविस्तर.
ADVERTISEMENT
प्रयागराज: उत्तर प्रदेशचा प्रयागराज जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराने हादरून गेला आहे. प्रयागराज अनेक भयानक घटनांचे साक्षीदार असला तरी बहुतांश घटना माफिया अतिक अहमदभोवती (Atiq Ahmed) फिरत होत्या. या माफियांचा धाक एवढा होता की त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस कोणीच करत नव्हते. पण अशी एक वर्ष असं आलं की, ज्याची कल्पना अतिक किंवा उत्तर प्रदेशमधील कोणीही केली नव्हती. (from umesh pal murder to atiq ashrafs murder a gruesome end to a 2 decade old feud)
ADVERTISEMENT
2004 मध्ये राजू पाल यांनी बसपाच्या तिकीटावर अतिक अहमद याचा धाकटा भाऊ मोहम्मद अशरफ याच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि विजय देखील मिळवला होता. यानंतर 25 जानेवारी 2005 रोजी राजू पाल याची हत्या करण्यात आली होती. अतिक आणि अशरफ यांच्यासह माफिया टोळीतील इतर सदस्यांवर या हत्येचा आरोप होता. या खून खटल्यात उमेश पाल हा साक्षीदार होता.
उमेशचे 2006 मध्ये अपहरण
2006 मध्ये अतिक अहमदने उमेशचे अपहरण केले होते. यासोबतच अतिकने उमेशला राजू पाल हत्याकांडात त्याच्या बाजूने साक्ष द्यायला लावली होती. पण, उमेश पाल यांनी अतिकवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल न्यायालयात हजर झाला होता. दुसऱ्या दिवशी कोर्टात अतिकच्या वतीने वादविवाद होणार होता. पण, त्याआधीच अतिकच्या शूटर्सनी उमेशची हत्या केली. या हत्याकांडाने रस्त्यापासून विधानसभेपर्यंत एकच खळबळ उडाली होती.
हे वाचलं का?
हे देखील वाचा- मोठी बातमी: पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
मुख्यमंत्री योगी म्हणाले- माफियांना मातीत गाडून टाकू
राज्याचे प्रमुख योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात (विधानसभेत) माफियांना मातीत गाडून टाकू, असे ठणकावून सांगितले होते. या वक्तव्यासोबतच यूपी पोलीसही अॅक्शनमध्ये आले आणि त्यांनी आरोपींवर कारवाई केली. हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी पहिली चकमक केली. यामध्ये अरबाज नावाच्या एका बदमाशाचा मृत्यू झाला. नेहरू पार्कच्या जंगलात ही चकमक झाली होती.
हे देखील वाचा- ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ अतिकचे शेवटचे शब्द अन् थेट डोक्यात गोळी…
6 मार्च रोजी विजय कुमार पोलीस चकमकीत ठार
यानंतर 6 मार्च रोजी आणखी एक आरोपी विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी चकमकीत मारला गेला. पोलीस आणि उस्मान यांच्यात ही चकमक प्रयागराजच्या कौंधियारा भागात झाली होती. उमेश पालवर प्रथम गोळी झाडणारा शूटर उस्मान हा होता.
ADVERTISEMENT
..अन् अतिकचा मुलगाही झाला ठार
यानंतर 13 एप्रिल रोजी आणखी दोन शूटर्स मारले गेले. ही चकमक माफिया अतिकसाठी वैयक्तिक नुकसान पोहचवणारी होती. कारण यामध्ये अतिकने आपला मुलगा गमावला होता. मुलाच्या मृत्यूनंतर अतिक कोलमडून गेला होता. पोलीस कोठडीत आल्यानंतर तो अनेकदा मीडियासमोर आला. मात्र, काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचे कारण म्हणजे मुलगा गमावल्याच्या दु:खात तो कोलमडून पडला होता.
ADVERTISEMENT
हे देखील वाचा- Crime : मालकाच्या हत्येनंतर मृतदेह पुरला अन् त्यावर… घृणास्पद प्रकाराने पोलिसही हादरले
सगळ्यात दोन दशकांपूर्वी राजू पालच्या हत्येनंतर अडचणीत आलेल्या अतीक आणि त्याच्या भावाचा असा अंत होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. प्रयागराज पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. दरम्यान, पोलिसांच्या सुरक्षा गराड्यात घुसून तीन हल्लेखोरांपैकी एकाने आधी पिस्तुलातून अतिकच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर सर्वांनी अनेक राऊंड फायर करून दोन्ही भावांची हत्या केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT