Gay Dating App वरुन बोलवलं, शारीरिक संबंध आणि न्यूड व्हिडीओ; तरुणाने…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gay dating app made relationship nude video viral money threatening kanpur crime story
gay dating app made relationship nude video viral money threatening kanpur crime story
social share
google news

डेटिंग अ‍ॅपच्या (Dating App) माध्यमातून फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता कानपूरमधून समोर आली आहे. या घटनेत एका समलैंगिक (गे) डेटिंग अ‍ॅपवरून अनके तरूणांची फसवणूक झाल्याची घटना उजेडात आली आहे.ही टोळी समलैंगिक (Gay) तरूणांना घरी बोलावून त्यांच्यासोबत संबंध ठेवायची. त्यानंतर व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसै उकळायची. या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहेत. तसेच या टोळीच्या कसून तपास सूरू आहे. (gay dating app made relationship nude video viral money threatening kanpur crime story)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पॉलिटेक्निक आणि एसएससीची तयारी करणाऱ्या एका तरूणांच्या ग्रुपने ब्लड नावाच्या एका समलैंगिक (गे) डेटिंग अ‍ॅपवर (Dating App) रजिस्टर केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून इतर समलैंगिक तरूणांच्या संपर्कात येण्याचा मानस होता. अशाप्रकारे आरोपी समलैंगिक तरूणांच्या संपर्कात येऊन त्यांना घरी बोलावून ब्लॅकमेल करून फसवणूक करायचे.

हे ही वाचा : Crime news : …म्हणून गर्लफ्रेंडचा मोबाईल केबलनेच घोटला गळा अन् अंगणात फेकला मृतदेह

तरूणांनी समलैंगिक (गे) डेटिंग अ‍ॅपवर रजिस्टर केल्यानंतर त्यांच्यासोबत सुरूवातीला मैत्री केली जायची. यानंतर या तरूणांना शारीरिक संबंधाची ऑफर देऊन घरी बोलावले जायचे. समलैंगिक तरूण घरी येताच संबंध ठेवतानाचे त्याचे काही नकळत व्हिडिओ किंवा फोटो काढले जायचे. यानंतर आरोपी टोळीकडून समलैंगिक तरूणांना बेदम मारहाण करून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जायची. या धमकीनंतर तरूणांकडून पैसे उकळले जायचे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात 8 ऑगस्टला पोलीस (police) ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत पीडित समलैंगिक तरूणाने सांगितले की, एका अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर आरोपीने त्याला दारू पिण्यासाठी आपल्या घरी बोलावले. त्यानुसार पीडित समलैंगिक मुलगा हा आरोपीच्या घरी गेला होता. पीडित समलैंगिक मुलगा दारू पित असतानाच त्याच्या मागून अनेक तरूण समोर आले. आणि या व्यक्तींनी तरूणासोबत अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्याचा न्युड व्हिडिओ देखील बनवला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडित मुलाने त्याच्या युपीआय अकाऊंटवरून 25 हजार रूपये आरोपींना ट्रान्सफर केले होते. तसेच आणखीण एका पीडित तरूणाने या प्रकरणी बेदम मारहाण करून लुटमार केल्याचीही घटना घडली आहे.

हे ही वाचा : प्रेम, अपहरण आणि गँगरेप… गर्लफ्रेंडच्या अब्रूचे मित्रांसोबत महिनाभर तोडले लचके

या प्रकरणात अतिरीक्त पोलीस अधिक्षक लाखन यादव म्हणाले की, मिळालेल्या माहितीनूसार, 9 ते 10 समलैंगिक तरूणासोबत ही घटना घडली आहे. अद्याप तरी या प्रकरणात फसवणूक झालेली समलैंगिक तरूण समोर आले नाही आहेत. मात्र या प्रकरणात कारवाई केल्यानंतर अनेक तक्रारी समोर येण्याची शक्यता असल्याचे लाखन यादव म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT