Israel: ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा, तरूणीच्या अंगावर बसून दहशतवाद्यांनी तोडले अब्रूचे लचके!
इस्रायल-अरबमधील वाद फार जुना आहे. तसंच, पॅलेस्टाईन -इस्रायलमधील वादही जुनाच आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांवरील कुरघोडीचा प्रयत्न सुरुच असतो. अशात, येथील पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री इस्त्राईलवर एअर स्ट्राईक केली.
ADVERTISEMENT

Israel Palestine Crisis : इस्रायल-अरबमधील वाद फार जुना आहे. तसंच, पॅलेस्टाईन -इस्रायलमधील वादही जुनाच आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांवरील कुरघोडीचा प्रयत्न सुरुच असतो. अशात, येथील पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री इस्त्राईलवर एअर स्ट्राईक केली. (German tattoo Artist Killed by Hamas Terrorist In israel-Palestine war)
शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे इस्रायलमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण जग हादरले. हमासच्या दहशतवाद्यांनी काही मिनिटांतच 5000 रॉकेट डागले. त्यांचे डझनभर सशस्त्र दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. येथील सर्वसामान्य नागरिकांचे अपहरण करण्यात आले. ज्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या सर्वाधिक आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. यामध्ये रक्ताने माखलेल्या महिला रडताना दिसत आहेत आणि हमासचे दहशतवादी त्यांच्यावर आपला जोर दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.
Israel Palestine : धर्म अन् भूमी… इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्षाची कहाणी काय?
अशाच एका व्हिडीओने संपूर्ण जगाला स्तब्ध केलं आहे. व्हिडीओमध्ये एका मुलीचा मृतदेह ट्रकवर ठेवलेला दिसत आहे. त्यावर दहशतवादी बसले आहेत. ते मृतदेहाचे कपडे काढतात. त्यावर थुंकतात आणि बंदुका दाखवून इस्रायलवरील हल्ल्याचा आनंद साजरा करत आहेत. यावेळी त्यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणाही दिल्या. त्यांचा असा विश्वास होता की त्यांनी एका इस्रायली महिला सैनिकाला पकडले होते.
पण, आता या मुलीची ओळख पटली आहे. त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या मुलीचं नाव शानी लाउक होतं. ती जर्मनीत राहत असून एक टॅटू आर्टिस्ट आहे. ती इस्रायलमध्ये संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी आली होती. हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून इतरांसह शानीचे अपहरण केले. यानंतर त्यांनी 30 वर्षीय शानीची हत्या केली.