Ghatkopar Accident: होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे कुठे लपला होता?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Hoarding Collapsed Case Update : मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेत  मोठी जीवितहानी झाली. 66 तासांपासून सुरू असलेली मदत आणि बचाव कार्य गुरुवारी (16 मे) सकाळी बंद करण्यात आलं आहे. या घटनेत 70 हून अधिक वाहनं ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आली आहेत. यादरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने होर्डिंगचा मालक आणि मुख्य आरोपी भावेश भिंडे याला राजस्थानमधून अटक केली आहे. तो उदयपूरमध्ये लपून बसला होता. सध्या मुंबई गुन्हे शाखा त्याची चौकशी करत आहे. (ghatkopar accident where was bhavesh bhinde the main accused in the hoarding collapsed incident arrested)

मुंबईत सोमवारी (13 मे) जोरदार वादळ आले आणि पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान, घाटकोपर परिसरातील छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर 120 फूट x 120 फूट आकाराचे होर्डिंग कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक लोक आणि वाहने गाढली गेली. या अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 16 असून 75 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा: PM Modi : पत्रकार परिषद घेत नाही कारण...; अखेर मोदींनी दिलं उत्तर

 

क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आला मलबा

मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी (16 मे) सकाळी अपघात स्थळावरील 66 तास चाललेली शोध आणि बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सकाळी 10.30 वाजता महापालिका मुख्याधिकाऱ्यांनी बचावकार्य थांबवले, मात्र जेसीबी, डंपर, क्रेन इत्यादी उपकरणांच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. याआधी बुधवारी (15 मे) मध्यरात्री बचाव पथकाने गर्डरखाली कारमध्ये अडकलेल्या दोन मृतदेहांना बाहेर काढले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा: 'पुतीनचा मला फोन आलेला, निवडणुकीत पुन्हा..', मोदींचं मोठं विधान

पेट्रोल पंपावर घेतली जातेय खबरदारी

अन्य एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल पंपाच्या टाक्यांमधील इंधनाचा साठा लक्षात घेता अग्निशमन दलाने अजूनही तीन अग्निशमन दल आणि काही वरिष्ठ अधिकारी तेथे तैनात केले आहेत.

या दुर्घनेतील मुख्य आरोपी कुठे बसला होता लपून?

होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उदयपूर, राजस्थान येथून अटक केली आहे. रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात आलं. भावेशला गुन्हे शाखा युनिट 7 च्या कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. तिथे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा: 'तुम्ही रक्ताचे ना? मग बाळासांहेबांसोबत असं का केलं?'

भावेश हा होर्डिंगचा मालक होता. त्याच्या एजन्सीने होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. हा होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने लावला होता. इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. भिंडेवर यापूर्वी 23 गुन्हे दाखल आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात त्याच्यावर मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT