प्रसिद्ध मॉलमध्ये प्रचंड मोठं सेक्स रॅकेट, तरुण-तरूणींना नेण्यासाठी बोलावली थेट बस!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ghaziabad-prostitution-racket-pacifiC-mall-100-girls-boys arrested-in-raid
ghaziabad-prostitution-racket-pacifiC-mall-100-girls-boys arrested-in-raid
social share
google news

Ghaziabad prostitution racket : स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (sex racket) सुरु असल्याच्या आतापर्यंत अनेक घटनांचा पर्दाफाश झाला आहे. असाच पर्दाफाश आता पुन्हा एकदा पोलिसांनी केला आहे. या घटनेत देखील पॅसिफीक मॉलमध्ये (pacific mall) स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्पावर छापा टाकून 61 तरूणी आणि 39 तरूणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या तरूण-तरूणींना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलिसांना एक बस बुक करावी लागली होती. आता या प्रकरणात ताब्यात असलेल्या तरूण-तरूणींची पोलीस (Police) चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(ghaziabad prostitution racket pacific mall 100 girls boys arrested in raid)

ADVERTISEMENT

गाझियाबादच्या (ghaziabad) लिंक रोड परिसरातील पॅसिफीक मॉल (pacific mall) परीसरात ही घटना घडली आहे. या पॅसिफीक मॉल परीसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (sex racket) चालायचा. मॉलला अनेक तरूण-तरूणी यायचे, त्यामुळे पोलिसांना फारसा संशय नव्हता. मात्र डिसीपी विवेक चंद्र यादव यांना पॅसिफीक मॉलमध्ये 8 मुलींकडून स्पा सेंटरमध्ये देह व्यापार करून घेत असल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती. ही खबर पक्की असल्याची माहिती मिळताच ट्रान्स हिंडनचे डीसीपी विवेक चंद्र यादव यांच्या विशेष पथकाने एसीपी साहिबााबाद भास्कर वर्मा आणि एसीपी इंदिरापुरम स्वतंत्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पॅसिफिक मॉलच्या स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. या छाप्यात 61 तरूणी आणि 39 तरूणांना ताब्यात घेण्यात आले. ही सर्व ताब्यात घेतलेली माणसं गाझियाबादच्या नोएडा सहित दिल्ली एनसीआर शहरात राहणारी आहेत.

हे ही वाचा : 50 हजाराची सुपारी अन् भाड्याचे गुंड, बायकोने फुलप्रुफ प्लान करून पतीचा काढला काटा 

असं सुरू होतं सेक्स रॅकेट

ग्राहक स्पामध्ये (sex racket) मसाज करायला यायचे मात्र त्यांना सेक्स करण्याची ऑफर दिली जायची. अशाप्रकारे स्पाच्या नावाखाली देह व्यापाराचा व्यवसाय चालायचा. पोलिसांनी छाप्यातून ताब्यात घेतलेल्या 69 मुलींमधल्या काही विदेशी तरूणी देखील होत्या. पोलिस आता हा देह व्यापाराच्या धंदा चालवणाऱ्या मास्टरमांईडचा शोध घेतेय.यासाठी पोलिसांनी ताब्यात असलेल्या तरूण-तरूणींची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या पॅसिफीक मॉलमध्ये अनेक कुटुंबिय त्यांच्या लहान मुलांना घेऊन यायचे. आता या घटनेची माहिती कळताच त्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.आता या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या अटकेकडे शहराचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 134 करोडची संपत्ती, लग्नाच्या तासाभरात मृत्यू, तरूणासोबत काय घडलं? 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT