AI चं काम लय बेक्कार! सायबर गुन्हेगारांची लॉटरी लागणार? थेट PM मोदींचंच बोगस मतदान कार्ड बनवलं
आता सायबर गुन्हेगारांना याचा चांगलाच फायदा होणार असल्याचं दिसतंय. जेव्हा या मॉडेलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे दस्तऐवज तयार करायला सांगितलं, तेव्हा त्यानं सुरुवातीला सुरक्षेच्या कारणामुळे नकार दिला. पण ते जे केलं, ते पाहाच...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सायबर गुन्हेगारांची लॉटरी लागणार?

तयार केलं पंतप्रधान मोदींचं बोगस मतदान कार्ड

सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं आणखी वाढणार?
Chat gpt Cyber Crime : भारतात सायबर गुन्हेगारांचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात सुळसुळाट झालाय. एकीकडे यंत्रणा त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवतायत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी प्रयत्न करतायत. सायबर गुन्हेगारांना आतापर्यंत सरकारी ओळखपत्रे आणि दस्तऐवज बनवण्यात अडचणी येत होत्या. पण आता चॅटजीपीटीमुळे हे काम सोप्प झालं आहे. त्यामुळे याकडे आता एक आव्हान म्हणूनही पाहिलं जाणार आहे.
सध्या ट्रेंडींग असलेल्या ओपनएआयच्या एआय मॉडेल GPT-4o च्या घिबली-शैलीतील फोटोचा प्रत्येकानेच आनंद घेतला. पण आता त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्रही तयार केली जात असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Thane : "दोन वेळा मुलीच झाल्या, मुलगा का होत नाही", पती सतत त्रास द्यायचा, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
एआय मॉडेलला काही माहिती दिल्यानंतर ते आता पूर्ण तपशीलांसह दस्तऐवज तयार करायला सांगितलं जातंय. तेव्हा ते तयार करत नाही. पण काही प्रसिद्ध सोशल मिडियावर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींचे बनावट दस्तऐवज ते क्षणार्धा तयार करतं. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना आणखी चालना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
इंडिया टुडेच्या टीमने जेव्हा GPT-4o ला बनावट आधार कार्ड तयार करण्यास सांगितलं, तेव्हा त्यानं दिलेला रिझल्ट धक्कादायक होता. एआयने तयार केलेला हा ओळखपत्र एवढं खरं दिसत होतं की फक्त त्याबद्दलच्या तज्ञांनाच त्यातल्या चुका लक्षात येतील. एवढंच नाही तर आधार कार्ड पॅन कार्डसह, पासपोर्ट आणि मतदार कार्डचा पूर्ण सेटच ते तयार करुन देतंय.