Thane : "दोन वेळा मुलीच झाल्या, मुलगा का होत नाही", पती सतत त्रास द्यायचा, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
Thane Crime : आरोपी विशाल गवई याने दर्शनासोबत प्रेमविवाह केला होता. विशाल गवई पत्नीच्या आई-वडिलांकडे नेहमी पैसे मागायचा. यातून दोघांमध्ये वाद व्हायचा. त्यानंतर दोन मुलींना जन्म दिल्याने दर्शनाचा छळ व्हायचा. याच त्रासाला कंटाळून तीने गच्चीवार जात गळफास घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना...

मुलगा होत नाही म्हणून पतीने पत्नीला त्रास दिला

पत्नीने थेट शेवटचा निर्णय घेतला
Thane Crime : एकीकडे सरकार, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, सामाजिक चळवळी देशभरात महिला-मुलींच्या बाबतीत समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतायेत. तर दुसरीकडे अजूनही लोक मुलींना स्वीकारायला तयार नसल्याचं दिसतयं. मुलगी का झाली, मुलगा का होत नाही यावरुन वेगवेगळ्या पद्धतीनं मातेला त्रास दिल्याच्या अनेक घटना आपल्याला दिसतात. मात्र, ठाणे जिल्ह्यात अशाच एका बापाने थेट आपल्या पत्नीला तिचं जीवन संपवायला भाग पाडल्याचं दिसतयं. ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याने त्याने पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
हे ही वाचा >> "मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" बँकांमधला खळखट्याक थांबणार, मनसैनिकांना काय आदेश?
मुलगा का होत नाही म्हणून पती वारंवार आपल्या पत्नीला छळत होता. तसंच तीला आत्महत्येला प्रवृत्त करत होता. याच त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा होऊ न शकल्यामुळे 33 वर्षीय पती त्याच्या पत्नीला त्रास देत होता. यातूनच 25 वर्षीय पत्नीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
हे ही वाचा >> Viral News : बायकोचं अफेयर समजताच नवऱ्याची सटकली! प्रियकरावर फायरिंग केली अन् घडलं...
आरोपी विशाल गवई याने दर्शनासोबत प्रेमविवाह केला होता. विशाल गवई पत्नीच्या आई-वडिलांकडे नेहमी पैसे मागायचा. यातून दोघांमध्ये वाद व्हायचा. त्यानंतर दोन मुलींना जन्म दिल्याने दर्शनाचा छळ व्हायचा. याच त्रासाला कंटाळून तीने गच्चीवार जात गळफास घेतला.