मैत्री, प्रेम आणि नंतर समलैंगिक संबंध, लग्न ठरलं अन् खुनी खेळ…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Homosexual friend strangled to death, incident in Amroha, Uttar Pradesh
Homosexual friend strangled to death, incident in Amroha, Uttar Pradesh
social share
google news

Murder of a homosexual : उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये समलैंगिक (Gay) संबंधातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. हे दोघं मित्र गेल्या अनेक दिवसांपासून समलैंगिक संबंधात (Homosexual relationship) होते. मात्र त्यामधील एका मित्राचं अचानक लग्न ठरले. त्यामुळे त्यातील एक मित्र दुसऱ्या मित्राबरोबर संबंध (Relationship) ठेवण्यासाठी नकार देत होता. मित्र आपल्याबरोबर संबंध ठेवण्यास नकार देत असल्यामुळेच त्याने आपल्या मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह उसाच्या फडात टाकून देण्यात आला. ही हत्या झाल्यानंतर अमरोहा पोलिसांनी अवघ्या 12 तासात त्याचा शोध लावला.

ADVERTISEMENT

मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात

ही खळबळ जनक घटना अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर ठाण्यातील सिमथलामधील आहे. सिमथलामधीलच जितेंद्र आणि अजय यांची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मैत्री होती. हे दोघं मित्र एकमेकांच्या शेजारीच राहत होते.तर ते हरियाणामध्ये ते कामही करत होते. हरियाणामध्ये असतानाच त्यांचे समलैंगिक संबंध आले. त्याच वेळी जितेंद्रचे लग्न ठरले होते. त्यामुळे जितेंद्र अजयपासून लांब लांब राहू लागला, त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

लग्नामुळं नात्यात दुरावा

हरियाणामधून हे दोघं मित्र आपल्या गावी आले होते. त्याच जितेंद्र जवळच असलेल्या यात्रेत तो फिरायला गेला होता. तो एकटाच फिरायला गेल्याचे समजताच अजय त्याच्यावर प्रचंड नाराज झाला होता. त्याच वेळी त्याने जितेंद्रचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर अजयने जितेंद्रला एका उसाच्या फडात बोलवले आणि उसातच दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनीही अवघ्या 12 तासात हत्या करणाऱ्याचा शोध लावून त्याला अटक केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ह्रदयद्रावक! 2 वर्षाच्या चिमुकलीचा घोटला गळा, सोफ्याखाली लपवला मृतदेह; कारण…

उसाच्या मळ्यातच संपवलं

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 15 ऑक्टोबरला आदमपूर परिसरातील एका उसाच्या मळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अजयला अटक करुन माहिती घेतली असता ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचे उघड झाले.

दुरावा सहन नाही झाला

अजयला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने सांगितेल की, गेल्या दोन वर्षापासून हरियाणामध्ये आम्ही दोघं काम करत होतो. त्याकाळात आमच्या दोघांमध्ये प्रेम वाढून आमच्यात जवळकीता निर्माण झाली. त्यानंतर जितेंद्रचा विवाह ठरला होता. त्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे या गोष्टीमुळे मला आमच्या नात्याविषयी काळजी वाटू लागली. त्यातच 14 ऑक्टोबर रोजी तो मला सोडून यात्रेत फिरायला गेला. त्याचा मला प्रचंड राग आला होता. त्याचवेळी मी ठरवले की त्याची हत्या करायची ठरवले. त्यानंतर त्याला फोन केल्यावर तो मला माझ्या घरी भेटायला आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gadchiroli: भरवला विषाचा घास… घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ

लग्न माझ्याशीच कर

जितेंद्र घरी आल्यावर 15 ऑक्टोबरला आम्ही हरियाणाला जायचे ठरवले होते. मात्र हरियाणामध्ये त्याला मारले असते तर माझ्यावर लोकांनी संशय घेतला असता. त्यामुळे त्याची हत्या अमरोहामध्येच करायचे ठरवले आणि त्याचा काटा काढला. जितेंद्र घरी आल्यावर आम्ही फिरण्यासाठी म्हणून शेतात गेलो. त्यावेळी घरातील दोरी मी माझ्या खिशात घेतली होती. शेतात गेल्यावर त्याच्या लग्नाला माझा नकार दर्शवला. तू लग्न करु नकोस असं सांगितल्यानंतर त्याचा माझा त्यावरुन वाद झाला. त्याचवेळी त्याचा दोरीने गळा आवळला आणि वापरलेली दोरी शेतातच टाकून दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT