Mumbai Crime : अंधेरीत भाडेकरूमुळे घरमालकाने घेतला गळफास, प्रकरण काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maharajganj, Uttar Pradesh mumbai, andheri crime news marathi : house owner commits suicide. police filed Fir.
Maharajganj, Uttar Pradesh mumbai, andheri crime news marathi : house owner commits suicide. police filed Fir.
social share
google news

Mumbai Crime news marathi : अंधेरीतील सहार गावात घरमालकाने भाडेकरूमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी भाडेकरू, एजंटासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्या केलेल्या घरमालकाचे नाव राल्फ रोड्रिक्स असे आहे. तर भीमसेन गोकुळे असे भाडेकरूचे नाव आहे. रिनोल्डो रोड्रिक्स हे मयताचे चुलत भाऊ असून, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिनोल्डो रोड्रिक्स (वय 43) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे राल्फ रोड्रिक्स यांनी पहिल्या मजल्यावरील घर जानेवारी 2021 मध्ये भीमसेन गोकुळे याला भाडे तत्त्वावर दिले होते. त्यानंतर राल्फ यांनी नोव्हेंबरमध्ये गोकुळेला घर खाली करण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घर भाड्याने देणाऱ्या दलालाने केली हेराफेरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दलाल कॅमील घोन्साळवीस, इम्तियाज शेख, सुरेंद्र चौहान, नीलेश निकाळजे आणि अलेक्स व्हॅलेंटाईन एंथनी डिसुजा यांनी खोटा भाडेकरार तयार केला. त्याचबरोबर गोकुळे दाम्पत्याला हेवी डिपॉझिटवर भाड्याने घर दिले.

हेही वाचा >> संभाजी भिडे धावले शिंदे सरकारच्या मदतीला, मनोज जरांगेंना काय दिला मेसेज?

दुसरीकडे त्यांनी राल्फ रोड्रिक्सला डिपॉझिटची रक्कम न देता केवळ भाडे कराराची कागदपत्रे दिली. हेवी डिपॉझिटची रक्कम एजंटकडे दिलेली असल्याने गोकुळे घर रिकामे करत नव्हता. ही माहिती राल्फ रोड्रिक्सने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे.

ADVERTISEMENT

घरमालकाविरुद्ध भाडेकरूच्या पत्नीच्या तक्रारी

या वादामुळे राल्फ रोड्रिक्सला नैराश्य आले. हे प्रकरण इथेच थांबलं नाही. भाडेकरू गोकुळेची पत्नी ज्योती ही वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन राल्फ रोड्रिक्स विरुद्ध तक्रारी करत होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Sovereign Gold Bond : गोल्ड बाँड काय, परतावा किती, कशी करायची खरेदी? जाणून घ्या सर्वकाही

9 सप्टेंबर रोजी राल्फ रोड्रिक्सने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेची माहिती सहार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घराची पाहणी केली. यावेळी राल्फ रोड्रिक्सने लिहिलेली सुसाईड नोट सापडली.

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?

सुसाईड नोटमध्ये एजंट, भाडेकरू गोकुळे दाम्पत्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटलेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एजंट, भाडेकरू भीमसेन गोकुळे, त्याची पत्नी ज्योती गोकुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT