नवऱ्याने टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितलं अन् पत्नीने थेट चाकू भोसकून जीवच घेतला...

मुंबई तक

घरातील किरकोळ वादातून पत्नीने आपल्या पतीची चाकू भोसकून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, मृत पतीने आपल्या पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यासाठी सांगितलं आणि त्या एका कारणावरून पत्नी प्रचंड संतापली.

ADVERTISEMENT

पत्नीने थेट चाकू भोसकून नवऱ्याचा जीवच घेतला...
पत्नीने थेट चाकू भोसकून नवऱ्याचा जीवच घेतला...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितलं अन्...

point

पत्नीने चाकू भोसकून थेट जीवच घेतला...

Crime News: आंध्र प्रदेशातील मंगलागिरी येथून कौटुंबिक वादाचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. घरातील किरकोळ वादातून पत्नीने आपल्या पतीची चाकू भोसकून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, मृत पतीने आपल्या पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यासाठी सांगितलं आणि त्या एका कारणावरून पत्नी प्रचंड संतापली. याच वादातून तिने पतीच्या शरीरात चाकू भोसकला आणि त्याची हत्या केली. सध्या, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती आहे. 

टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून वाद... 

एजन्सीच्या माहितीनुसार, 27 वर्षीय शेख अहमद असी मृताची ओळख समोर आली असून त्याने आपल्या पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यासाठी सांगितलं होतं आणि याच कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या जोडप्याचं फक्त आठ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि ते अमरावतीमध्ये एकत्र राहत होते. टीव्हीच्या आवाजावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने थेट पतीचा जीवच घेतला. 

पत्नीने चाकू भोसकून पतीचा जीवच घेतला 

पोलिसांच्या माहितीनुसार, वाद सुरू असताना महिलेने पतीवर चाकूने निर्घृण वार केले. या घटनेनंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतर सुद्धा त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून तिच्या मुलाने सुनेला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले होतं आणि त्यामुळे रागाच्या भरात आरोपी महिलेने पतीवर हल्ला करून त्याचा खून केल्याचं सांगितलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: म्हाडाची नवी लॉटरी! 31 लाखात मिळणार मुंबईत स्वप्नातलं घर... कोणत्या परिसरात फ्लॅट्स उपलब्ध?

संबंधित प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, एका टीव्हीच्या आवाजावरून महिलेने तिचा पतीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, या जोडप्याचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. या घटनेनंतर, पीडित तरुणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली की, तिच्या मुलाने सुनेला टीव्हीचा आवाज कमी करण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर पत्नीने त्याच्यावर चाकूने वार केला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp