Crime:बायकोशी वाद झाला, पित्याने पोरालाच संपवलं, धक्कादायक घटनेने शहर हादरलं
हरियाणाच्या (Hariyana) रोहतकमधून (Rohtak) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच आपल्याच 7 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठत आपला मोठा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
हरियाणाच्या (Hariyana) रोहतकमधून (Rohtak) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच आपल्याच 7 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठत आपला मोठा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पत्नीने पोलिसांकडे पती सुनीलवरच संशय व्यक्त केला होता. या संशयानंतर पोलिसांनी सुनील ढिल्लो यांची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा केला. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे. (husband wife fightfather killed his 7 year old son drowning in canal shocking story from hariyana rohtak)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या घटनेत पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे. याच वादातून सूनील ढिल्लोने मोठ्या मुलाच्या हत्येचा प्लान आखला होता. त्यानुसार सूनील 5 ऑगस्टला आपला मुलगा दीपांशूला पाणी भरण्यासाठी कालव्यात घेऊन गेला. सुनील देखील वडिलांसोबत बाईकवरून पाणी भरायला जायचा, या विचाराने खुश होता, मात्र त्याला कुठे माहिती होतं, हा त्याच्या आयुष्याचे शेवटच्या दिवस असणार होता. ज्या पित्याने त्याला जन्म दिला होता, तो पिताच त्याच्या जीवावर उठणार होता. आरोपी बापाने मुलाला कालव्यात बुडवून त्याची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी बापाने पोलिस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
हे ही वाचा : ‘…आणि नरेंद्र मोदींना मारून टाकेन’, पुण्यातील तरुणाची धमकी, पोस्टमध्ये काय?
वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु करायला सुरुवात केली. घराजवळील आणि रस्त्यानजीक असलेल्या दुकानाचे सीसीटीव्ही मागवले आणि तपास सुरु केला. या तपासा दरम्यान पोलीस कुटुंबियांची देखील चौकशी करत होते.या चौकशीत पत्नीने पती सुनीलवर संशय व्यक्त केला होता. या संशयातून पोलिसांनी वडील सुनील ढिल्लो यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही फुटेज दाखवले, ज्यामध्ये मृत मुलगा हा वडिलांच्या शेवटचा गाडीवर दिसला होता. त्यानंतर वडील एकटेच घरी परतले होते. मात्र मुलगा काही दिसला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सुनीलला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेची उकल केली.
हे वाचलं का?
अर्बन एस्टेट ठाण्याचे तपास अधिकारी एएसआय शुभम यांनी सांगितले की, बोहर गावचा रहिवाशी असलेले सुनील यांनी पोलीस ठाण्यात मोठा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता पत्नीने पतीसोबत भांडण होत असल्याची माहिती दिली होती. याच कारणामुळे पती सुनील ढिल्लो याने दीपांशुची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता.यानंतर पोलिसांनी पती सुनील ढिल्लोची कसून चौकशी करून संपूर्ण घटनेचा उलगडा केला. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपी पित्याला कोर्टात दाखल केले होते. यावेळी कोर्टाने पित्याला एक दिवसाची रिमांड दिली आहे. या घटनेने सध्या शहरात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून भयंकर हत्याकांड! तरुणाला बेदम मारलं अन् जिवंत असतानाच फेकलं विहिरीत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT