Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसने पालघर स्टेशन सोडलं आणि त्यानंतर काही वेळातच गाडीत भयंकर घटना घडली. सोमवारी (31 जुलै) पहाटे साडेपाच वाजता धावत्या रेल्वेमध्ये गोळीबार करण्यात आला.
ADVERTISEMENT

Jaipur mumbai train firing news : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसने पालघर स्टेशन सोडलं आणि त्यानंतर काही वेळातच गाडीत भयंकर घटना घडली. सोमवारी (31 जुलै) पहाटे साडेपाच वाजता धावत्या रेल्वेमध्ये गोळीबार करण्यात आला. जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेनमधील बोगी क्रमांक 5 मध्ये झालेल्या या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह 3 प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतनने अंदाधूंद गोळीबार केल्यानंतर धावत्या गाडीतूनच खाली उडी घेतली. (Four people have died in the firing on the Jaipur-Mumbai passenger train. This train was coming from Gujarat to Mumbai.)
वापी ते बोरीवली मीरा रोड स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर जीआरपी मुंबईच्या जवानांनी आरोपी कॉन्स्टेबलला मीरा रोड, बोरिवली येथे अटक केली आणि त्यानंतर आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही आरपीएफचे जवान ड्युटीवर होते आणि कार्यालयीन कामासाठी मुंबईत येत होते. आरोपी जवानाने आपल्या सर्व्हिस गनमधून गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितलं.
कोणत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला?
जयपूर एक्सप्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेस (12956) बी-5 बोगीमध्ये गोळीबार झाला. ट्रेन जयपूरहून मुंबईकडे येत होती.
गोळीबार कधी आणि कुठे झाला?
पालघर स्थानकापासून काही अंतरावर ट्रेन गेल्यानंतर हे घडल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे 5.23 वाजता वापी ते बोरिवली स्थानकादरम्यान आरपीएफ कॉन्स्टेबलने अचानक गोळीबार केला.