Kalyan Crime : पत्नीच्या डोक्यात घातला दांडा, नंतर…; रिक्षाचालकाच्या कृत्याने कल्याण हादरले

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

kalyan crime news husband killed his wife attacked and strangled with a wooden stick shocking crime story from kalyan
kalyan crime news husband killed his wife attacked and strangled with a wooden stick shocking crime story from kalyan
social share
google news

Kalyan Crime News : कल्याणच्या (Kalyan) टिटवाळ्यातून (Titwala) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीनेच (Husband) लाकडी दाडक्याने हल्ला करून पत्नीला (wife) बेशुद्ध करत तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. अलीमुना अन्सारी (35) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पतीने आपल्या पत्नीची हत्या का केली? तसेच या हत्येमागचं खरं कारण आहे? याचा तपास पोलीस (Police) करीत आहेत. (kalyan crime news husband killed his wife attacked and strangled with a wooden stick shocking crime story from kalyan)

कल्याणच्या टिटवाळा परिसरात आरोपी मुयद्दीन अन्सारी त्याची बायको अलीमुना अन्सारी सोबत राहायचा. मयुद्दीन हा टिटवाळा येथे रिक्षा चालविण्याचे काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून मयुद्दीन यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद होत होते. हे वाद पुढे इतके वाढले गेले की आता वादातून हत्येची घटना घडली आहे.

हे ही वाचा : Ganpat Gaikwad : “ज्यांना गद्दारी करून…”, भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंच्या वर्मावर बोट

मयुद्दीन आणि अलीमुना अन्सारी यांच्यात नेहमीच कौटुंबिक वादातून भांडणे व्हायची. असेच भांडण घटनेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी पती-पत्नीमध्ये झाले होते. आणि या भांडणाने टोकाची परिसीमाच गाठली. भांडणाच्या याच रागातून संतापून मयुद्दीनने पत्नी अलीमुना अन्सारीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर अलीमुना बेशुद्ध झाली होती. त्यानंतर मयुद्दीनने अलीमुना अन्सारीचा गळा आवळून तिची हत्या केली. या हत्येने टिटवाळ्यात एकच खळबळ माजली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे. तसेच महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. या प्रकरणातील आरोपी पती मयुद्दीनला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.आरोपी मयुद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सूरू आहे.

हे ही वाचा : Gogamedi Murder: गोळ्या घालून केली चाळण, कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी?

दरम्यान या घटनेत प्राथमिक माहितीनूसार कौंटुबिक कारणामुळे पत्नीची हत्या केल्याचे कारण समोर आले होते. मात्र या हत्येमागे इतर दुसरे कोणतेही कारण नाही ना, याचाही तपास पोलीस करीत आहे. तसेय या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT