kolhapur News : ‘मला ते मारतील’, तरुणाने केलं असं काही की, सगळ्यांनाच फुटला घाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kolhapur news young boy crime news
Kolhapur news young boy crime news
social share
google news

kolhapur Crime : कोल्हापुरातील स्टेशन रोड वरील रेल्वे स्थानक समोरील रस्ता दुभाजकाच्या विजेच्या खांबावर आज दुपारी एक परप्रांतीय तरुण बसला होता. खांबावर चढून तो जोरजोरात विजेचा खांब हलवत असल्यानं, तो खांबावरून पडण्याची भीती लोकांना वाटत होती. त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत अवघ्या 15 मिनिटात संबंधित तरूणाला विनंती करून खाली सुखरूपणे उतरवण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यानंतर तरुणाला शाहुपूरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कामगारांबरोबर वाद

छत्तीसगड राज्यातील आंबर्डीया या गावचा देवरट केवट हा 28 वर्षीय युवक मे महिन्यापासून विटा इथं कॅनलच्या कामावर आहे. त्याचा तेथील इतर कामगारांबरोबर वाद झाला होता. त्यातून त्याला कंत्राटदारानं कोल्हापुरात आणून सोडलं होतं. सोमवारी रात्रभर तो रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. आज दुपारी त्याला आपल्या पाठीमागे 10-15 तरूण मारण्यासाठी येत असल्याचं जाणवलं.

हे ही वाचा >>Amravati Murder : डोक्यात संशयाचं भूत शिरलं, युट्यूबर व्हिडिओ बघून आई-भावाला…

घाबरून खांबावर चढला

त्यातूनच त्यानं पळत येवून, स्टेशन रोडवरील रस्ता दुभाजकाच्या मधोमध असलेल्या 35 फुट खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला खांबावरून खाली उतरवण्यासाठी विनंती करण्यात आली. मात्र तो धोकादायकरित्या जोरजोरानं खांब हलवत असल्यानं, अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अग्निशमन दलाला नागरिकांची मदत

दरम्यान काही नागरिकांनी अग्नीशमन दलाला कळवलं. सासने मैदान फायर स्टेशनवरील कर्मचारी तत्काळ स्टेशनरोडवर दाखल झाले. काही कर्मचारी त्या तरूणाला खाली उतरण्याची विनंती करू लागले. तर काहींनी खांबाला शिडी लावून, त्याला सुरक्षितरित्या खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान खांबावरील तरूण उडी मारण्याची शक्यता असल्याने काही तरुण अग्निशमन दलाची जाळी धरून त्याला वाचवण्यासाठी सज्ज होते. पंधरा मिनिटाच्या परिश्रमानंतर त्या तरूणाला खांबावरून सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

हे ही वाचा >> NCP Jalgaon Sabha : ‘…तर तुम्ही सरकारमध्ये काय करता?’; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

बघ्यांची गर्दी आणि मदत

दरम्यान या रोडवर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. स्थानक अधिकारी दस्तगिर मुल्ला, वाहन चालक नवनाथ साबळे, फायरमन विजय सुतार, संभाजी ठेपले, शिवाजी लिगाडे, प्रवीण लाड यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी बचाव कार्यात भाग घेतला होता. त्यानंतर परप्रांतीय तरूण देवरट केवट याला शाहुपूरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT