Ravindra Waikar : अमोल कीर्तिकरांविरोधात रणनीती काय? वायकरांनी दिलं उत्तर

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

रवींद्र वायकर.
रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकर अमोल कीर्तिकर आमने-सामने

point

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

point

एकनाथ शिंदेंनी वायकरांना दिली उमेदवारी

Ravindra Waikar Mumbai North West Lok Sabha 2024 : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रणनीती काय असणार आहे, याबद्दल वायकर यांनी उत्तर दिले. (Ravindra Waikar Latest Interview)

ADVERTISEMENT

पहा...रवींद्र वायकर यांनी मुंबई Tak ला दिलेली मुलाखत

वायकर यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

1) "नवी उमेदवार असतो, त्याला प्रचाराला वेळ द्यावा लागतो. पण, मी मुंबई महापालिकेत चार वेळा नगरसेवक होतो म्हणजे २० वर्षे नगरसेवक आणि शिक्षण समितीत असताना केलेली कामे, स्थायी समितीमध्ये कामे केली. रुग्णालयाची कामे केली. वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून दिल्लीपर्यंत काम केले."

हेही वाचा >> ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार 

2) "तोट्यात असलेली महापालिका मी नफ्यात आणली होती. विधानसभेतही मी याच पद्धतीने काम केले. राज्यमंत्री असताना कामे केली. वायकर म्हणजे का? हा ब्रॅण्ड झाला आहे. 35 वर्षे अविरत सेवा केली आहे." 

हे वाचलं का?

3) "ठाकरे परिवाराची साथ तुमच्यासोबत नसेल, तर हे कठीण नसेल का? या प्रश्नावर वायकर म्हणाले की, "आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक... १९७४ पासून मी शिवसेनेत आहे. ५० वर्षांपासून आहे. सामाजिक कारकीर्द माझी ५० वर्षांची आहे."

हेही वाचा >> पूनम महाजन यांचा पत्ता 'या' दोन कारणामुळे झाला कट 

4) "मी उद्धव ठाकरेंबरोबर होतो, त्यांच्यासोबत चांगली कामे केली. त्यांच्या सहकार्याने केली. आताच्या राजकारणात कोण कुठे हा बदल होतोच. राजकारणात आजचा दुश्मन उद्याचा दोस्त आणि  उद्याचा दोस्त आजचा दुश्मन असतो."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "फोडायला अक्कल लागत नाही", फडणवीसांवर वार, पवारांनी काय सुनावलं? 

5) "विधाता घडवत असतो, तो काय घडवेल हे मी सांगू शकत नाही. विधिलिखित चांगलंच घडलं पाहिजे, माझ्या बाबतीत ते एक चांगलं उदाहरण होईल. सर्व जाणता तुम्ही. हे जे घडवतो, ते देव घडवतो आणि देव चांगल्यासाठी घडवतो, असे मी समजतो." 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT