ह्रदयद्रावक! 2 वर्षाच्या चिमुकलीचा घोटला गळा, सोफ्याखाली लपवला मृतदेह; कारण…

ADVERTISEMENT

little girl strangled to death in Madhya Pradesh after she couldn't bear sound of her baby crying
little girl strangled to death in Madhya Pradesh after she couldn't bear sound of her baby crying
social share
google news

MP Crime : मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने बाळाच्या रडण्याचा आवाज (baby crying) सहन न झाल्यामुळे दोन वर्षाच्या आपल्या पुतणीचा गळा आवळून हत्या (Baby Murder) केली आहे. हनुमंतल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव नगर परिसरात सोमवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक (Women Arrested) केली आहे.

पोलिसांनी शक्कल लढवली

मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांसह अनेकांना याचा धक्का बसला होता. पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद शकील यांची 2 वर्षाची मुलगी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा शोध घेऊनही ती काही सापडली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी गेले असताना त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये विशेष काही मिळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी वडिलांच्या घरातच मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या चिमुकलीचा मृतदेह सोफासेटच्या खाली आढळून आला.

हे ही वाचा >> धक्कादायक! सख्ख्या बहिणीला वेश्या म्हणून विकलं, तीन मुलं असलेल्या पुरूषाकडेच..

रडण्याच्या आवाजाने राग अनावर

पोलिसांनी सांगितले की, दुपारच्या वेळी चिमुकली आपल्या काकीकडे गेली होती. त्यानंतर पुतणीला मामीने खाऊही दिले होते. त्यानंतर मुलीला तिच्या आईकडे जाण्यास सांगितले. कारण तिच्या काकीला त्यावेळी झोपायचे होते. मात्र मुलगी आपल्या आईकडे गेली नाही, मुलगी झोपू देत नव्हती म्हणून मामीने तिला मारहाणही केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृतदेह लपवला सोफ्याखाली

मामीने मारहाण केल्यामुळे चिमुरडीने रडायला सुरुवात केली. त्यामुळे मामीने तिला आणखी मारहाण केली. त्यानंतर तिने रागाच्या भरात तिने चिमुकलीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर लहान मुलीचा मृतदेह तिने सोफ्याखाली लपवून ठेवला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर आता त्या महिलेविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली आहे.

हे ही वाचा >> PSI Somnath zende : Dream11 मुळे निलंबन, PSI झेंडे कसे फसले?; अधिकाऱ्याने सांगितली Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT