Ganpat Gaikwad : 4 गोळ्या काढल्या, शिवसेनेच्या महेश गायकवाडांची मृत्यूशी झुंज सूरू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mahesh gaikwad condition critical 4 bullets taken out from his body jupitar hospital bjp mla ganpat gaikwad opened fire ulhasnagar firing incident
mahesh gaikwad condition critical 4 bullets taken out from his body jupitar hospital bjp mla ganpat gaikwad opened fire ulhasnagar firing incident
social share
google news

Mahesh Gaikwad Health Update : उल्हासनगरमध्ये शुक्रवारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस ठाण्यात जोरदार राडा झाल्याची घटना घडली होती. या राड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाडवर (Shivsena Leader Mahesh gaikwad) गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. आता या प्रकरणात महेश गायकवाड यांची हेल्थ अपडेट समोर आले आहे. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेनंतर महेश गायकवाडची प्रकृती नेमकी कशी आहे? हे जाणून घेऊयात. (mahesh gaikwad condition critical 4 bullets taken out from his body jupitar hospital bjp mla ganpat gaikwad opened fire ulhasnagar firing incident)

ADVERTISEMENT

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. या वादानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड चार गोळ्या लागल्या होत्या. तर गायकवाडचाा समर्थक राहुल पाटील याला दोन गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराच्या घटनेनंतर महेश गायकवाड आणि राहुल पाटील या उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खूपच गंभीर असल्याने दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या दोघांवर उपचार करून त्यांच्या शरीरातील गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

हे ही वाचा : Poonam Pandey जिवंत आहे… Video च केला शेअर; म्हणते कशी मी तर…

डॉक्टराने जारी केलेल्या पत्रात काय?

ज्युपिटर रूग्णालयाने एक पत्र जारी करून महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांना अंगावर गोळीबार झालेल्या अवस्थेत शुक्रवारी रात्री रूग्णालयात दाखत करण्यात आले होते. यानंतर महेश गायकवाड यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आयसीयुत व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.सध्या त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवून आहे, अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलने दिली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान महेश गायकवाड यांचा समर्थत राहुल पाटीलवर देखील गोळीबार झाल्यानंतर त्याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले होते. सध्या त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती ज्युपिटर रूग्णालयाने दिली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lal Krishna Advani यांना भारतरत्न जाहीर, PM मोदींनी स्वत: केली घोषणा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT