’80 हजार अश्लील फोटो अन् व्हिडिओ…’, हॅकरने जगभरातील महिलांना असं केलं लक्ष्य

मुंबई तक

तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये अशा अनेक वेबसाईट्स आणि अॅप्स आहेत, जे तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय करता, तुम्ही कोणाशी आणि कशाबद्दल बोलत आहात याची नोंद ठेवतात

ADVERTISEMENT

From 2010 to 2016, Christopher Taylor, a hacker by profession, hacked 772 webcams around the world using the technology.
From 2010 to 2016, Christopher Taylor, a hacker by profession, hacked 772 webcams around the world using the technology.
google news

Crime News : जसजसं तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतशी मानवाच्या आयुष्यातील गोपनीयता लोप पावत चालली आहे. पण अनेकांना हे अद्यापही लक्षात येताना दिसत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये अशा अनेक वेबसाईट्स आणि अॅप्स आहेत, जे तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय करता, तुम्ही कोणाशी आणि कशाबद्दल बोलत आहात याची नोंद ठेवतात. कालांतराने हा डेटा हॅक करून तुमच्याचविरुद्ध वापरला जातो. अनेकदा मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांचे अॅप्स, वेबसाइट्स सुरक्षित असल्याचा दावा करतात, पण हे दावे पोकळ ठरत असल्याच कित्येकदा दिसून येतं. (From 2010 to 2016, Christopher Taylor, a hacker by profession, hacked 772 webcams around the world using the technology)

एका ब्रिटीश व्यक्तीने ही टेक्नॉलॉजी वापरुन भयंकर गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. हा गुन्हा ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, ख्रिस्तोफर टेलर (60) असं या आरोपीचं नाव असून तो ब्रिटनमधील रहिवासी आहे. हा गुन्हा काही वर्षांपूर्वीचा आहे, मात्र त्यावर आता पुन्हा सुनावणी झाली. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. बोल्ट क्राउन कोर्टात एफबीआयने ख्रिस्तोफरवरील आरोपांची संपूर्ण यादीच वाचून दाखविली.

मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?

2010 ते 2016 या कालावधीत व्यवसायाने हॅकर असलेल्या ख्रिस्तोफरने टेक्नॉलॉजीचा वापर करुन जगभरातील 772 वेब कॅम हॅक केले. वेबकॅम म्हणजे ते कॅमेरे जे लोकांच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलच्या स्क्रिनवर असतात. यातून तुम्ही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. हे कॅमेरे हॅक करत त्याने महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड केले आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याजवळ सेव्ह करुन ठेवले. या व्हिडिओंमध्ये महिलांचे कपडे बदलताना, रोमान्स करतानाचे, योगा करताना किंवा इतर गोष्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो आहेत.

टेलर 2016 मध्ये पकडला गेला होता :

2016 मध्ये, हा ब्रिटीश माणूस इंग्लंडमध्ये घरी बसून हा गुन्हा करत असल्याची माहिती कोणीतरी एफबीआय एजंटना दिली. जेव्हा क्रिस्टोफरच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा सुरक्षा यंत्रणांना त्याच्या संगणकावरून गुप्त फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. त्याच्या क्रेझमध्ये तो हे फोटो आणि व्हिडिओ गोळा करत होता. रिपोर्टनुसार, तो अनेकवेळा आपल्या पीडितांना ऑनलाईन अश्लील साइट्सच्या लिंक पाठवत होता. त्यावर क्लिक केल्यावर त्याला पीडितेच्या कॉम्प्युटरवर पूर्ण अॅक्सेस मिळत असे. त्यावेळी त्याला 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

हे वाचलं का?